चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः||


नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका |
प्रश्न करी अति विशेखा | एक चित्ते परियेसा ||१||

जय जया योगीश्वरा | सिद्ध्मुर्ती ज्ञानसागरा |
पुढील चरित्र विस्तार | ज्ञान होय आम्हासी ||२||

उदर व्यथेच्या ब्राम्हणासी | प्रसन्न झाले कृपेसी |
पुढे कथा वर्तली कैसी | विस्तारावे आम्हाप्रती ||३||

ऐकोनी शिष्याचे वाचन | संतोष करी सिद्ध आपण |
श्रीसद्गुरूचरित्र चरित्र कामधेनु जाण | सांगता जाहला विस्तारे ||४||

ऐक शिष्य शिखामणी | भिक्षा केली ज्याचे भुवनी |
तयावरी संतोषोनी | प्रसन्न जाहले परियेसा ||५||

श्रीसद्गुरू भक्तीचा प्रकारु | पूर्ण जाणे तो द्विजवरू |
पूजा केली विचित्रु | म्हणोनी आनंद परियेसा ||६||

तया सांयदेव द्विजासी | श्रीसद्गुरू बोलती संतोषी |
भक्त हो रे वंशोवंशी | माझी प्रीती तुजवरी ||७||

ऐकोणी श्रीसद्गुरुंचे वचन | सांदेव विप्र करी नमन  |
माथा ठेवुनी चरणी | न्यासिता झाला पुनःपुन्हा ||8||

जय जया जगद्गुरु | त्रयामुर्तीचा अवतारू |
अविद्यामाया दिससी नरू | वेदां अगोचर तुझी महिमा ||9||

विश्व व्यापक तूची होशी | ब्रम्हा विष्णू व्योमकेशी |
धरिला वेश तू मानुषी | भक्तजन तारावया ||१०||
तुझी महिमा वर्णावयासी | शक्ती कैंची आम्हासी |
मागेन एक आता तुम्हासी | तें कृपा करणे श्रीसद्गुरुमुर्ती ||११||

माझे वंश पारंपारी | भक्ति द्यावी निर्धारी |
इह सौख्य पुत्रपौत्री | उपरी द्यावी सद्गती  ||१२||

ऐसी विनंती करुनी | पुनरपि विनवी करुनावाचनी |
सेवा करितो द्वारयवनी | महाशूर क्रूर असे ||१३||

प्रतिसंवत्सरी ब्राम्हणासी | घात करितो जीवेसी |
यांची करणे आम्हासी | बोलवीतसे मज आजि ||१४||

जाता तयाजवळी आपण | निश्चये घेईल माझा प्राण |
भेटी जाहली तुमचे चरण | मरण कैचे आपणासी ||१५||

संतोषोनी श्रीसद्गुरुमूर्ती | अभयंकर आपुले हाती |
विप्रमस्तकी ठेविती | चिंता न करि म्हणोनिया ||१६||

भय सांडूनी तुवा जावे | क्रूर यवना भेटावे |
संतोषोनी प्रियभावे | पुनरपि पाठवील आम्हापाशी ||१७||

जंववरी तुं परतोनी येसी | असो आम्ही भारावशी |
तुंवा आलीय संतोषी | जाऊ आम्ही येथोनी ||१८||

निजभक्त आमुचा तू होशी | पारंपार वंशोवंशी |
अखिलाभीष्ट तू पावसी | वाढेल संतती तुझी बहुत ||१९||

तुझें वंश पारंपारी | सुखे नांदती पुत्रपौत्री |
अखंड लक्ष्मी तया घरी | निरोगी होती शतायुषी ||२०||


ऐसा वर लाधोन | निघे सायंदेव ब्राम्हण |
जेथे होता तो यवन | गेला त्वरित तया जवळी ||२१||

कालांतक यम जैसा | यवन दृष्ट परियेसा |
ब्राम्हणते पाहता कैंचा | ज्वालारूप होता जाहला ||२२||

विमुख होवुनी गृहांत | गेला यवन कोपत |
विप्र जाहला भय चकित | मनीं श्रीसद्गुरुसी ध्यातसे ||२३||

कोप आलीय ओळबयसि | केंवी स्पर्शे अग्नीसी |
श्रीसद्गुरुकृपा होय ज्यासी | काय करिल क्रूरद्रुष्ट ||२४||

गरुडाचिया पिलीयांसी | सर्प तो कवणे परि ग्रासी |
तैंसे तया ब्राम्हणासी | असे कृपा श्रीसदगुरुंची ||२५||

का एखादे सिंहासी | ऐरावत केंवी ग्रासी |
श्रीसद्गुरुकृपा होय ज्यांसी | काय करिल क्रूरद्रुष्ट ||२६||

ज्यांचे हृदयी श्रीसद्गुरु स्मरण | त्यासी कैचे भय दारूण|
काळमृत्यू न बाधे जाण | अपमृत्यू कायकरी ||२७||

ज्यासी नाही मृत्यूचे भय | त्यासी यवन असे तो काय |
श्रीसद्गुरू कृपा ज्यासी होय | यमाचे मुख्य भय नाही ||२८||

ऐसेपरि तो यवन | अंतः पुरात जाऊन |
सुषुप्ती केली भ्रमित होऊन | शरीर स्मरण त्यासी नाही ||२९||

हृदय ज्वाळा होय त्यासी | जागृत होऊनी परियेसी |
प्राणांतक व्यथेसी | कष्ठतसे तये वेळी ||३०||

स्मरण असे नसे एकही | म्हणे शस्त्रे मारितो घाई |
छेदन करितो  अवेव पाही | विप्र एक आपणासी ||३१||

स्मरण जाहले तये वेळी | धावांत गेला ब्रह्मणा जवळी |
लोळतसे चरण कामळी | म्हणे स्वामी तूची माझा ||३२||

येंथे पाचारिले कवनी | जावे त्वरित परतोनी |
वस्त्रे भूषणे देवोनी | निरोप देतो तये वेळी ||३३||

संतोषोनी व्दिजावर | आला ग्राम वेगवक्त्र |
गंगातिरी असे वासर | श्रीसादागुरुचे चरण दर्शना ||३४||

देखोनिया श्रीसदगुरुसी | नमन करितो भावेसी |
स्तोत्र करी बहुवसी | सांगे वृतांत आद्यंत ||३५||

संतोषोनी श्रीसद्गुरुमूर्ती | तया व्दिजा आश्वासिती |
दक्षिण देश जाऊ म्हणती | स्थान स्थान तीर्थयात्रे ||३६||

ऐकोनी श्रीसद्गुरुंचे वचन | विनवितसे कर जोडून |
न विसंबे आता तुमचे चरण | आपण येईन समागमे ||३७||

तुमचे चरणेविन देखा | राहो न शके क्षण एका |
संसार सागर तारका | तूच देवा कृपासिंधू ||३८||

उद्धरावया सगरांसी | गंगा आणिली भूमीसा |
तैसें स्वामी आम्हासी | दर्शन दिधले आपुले ||३९||

भक्त वत्सल तुझी ख्याती | आम्हां सोडणे काय नीती |
सवे येऊ निशिती | म्हणोनी चरणी लागला ||४०||

येणेपरी श्रीसद्गुरुंसी | विनवी विप्र भावेसी |
संतोषोनी विनयेसी | श्रीसद्गुरु म्हणती तये वेळी ||४१||

कारण असे आम्हा जाणे | तीर्थे असती दक्षिणे |
पुनापिः तुम्हा दर्शन देणे | संवत्सरी पंचदशी ||४२||

आम्ही तुमचे गाव समीपत | वास करू हे निश्चित |
कलत्र पुत्र इष्ट भ्रात | मिळोनी भेट तुम्ही आम्हां ||४३||

न करा चिंता असाल सुखे | सकाळ अरिष्टे गेली दुखेः |
म्हणोनी हस्त ठेविती मस्तके | भाक देती तये वेळी ||४४||

ऐसे परि संतोषोनी | श्रीसद्गुरु निघाले तेथोनी |
जेथें असे आरोग्य भवानी | वैजनाथ महाक्षेत्र ||४५||

समस्त शिष्यां समवेत | श्रीसद्गुरु आले तीर्थे पाहत |
प्रखात असे वैजनाथ | तेथे राहिले गुप्त रुपें ||४६||

नामधारक विनवी सिद्धासी | काय कारण गुप्त व्हावयासी  |
होते शिष्य बहुवसी | त्यांसी कोठे ठेविलें ||४७||

गंगाधराचा नंदनु | सांगे श्रीसाद्गुरुचारित्र कामधेनु |
सिद्धमुनी विस्तारून | सांगे नामकरणीस ||४८||

पुढील कथेचा विस्तारू | सांगता विचित्र अपरू |
मन करुनी एकाग्रु | एका श्रोत्रे सकळीक हो ||४९||

इति श्रीसद्गुरुचरीत्रामृते परमकथा कल्पतारौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारक संवादे क्रूरयवन शासनं सायंदेव वरप्रदानं नाम चातुर्दशो अध्यायः ||१४||

|| श्रीसद्गुरुदत्तात्रेयपर्णमस्तु || || श्रीसद्गुरुदेवदत्त ||













श्री गगनगिरी महाराज आश्रम, खोपोली

 श्री गगनगिरी महाराज आश्रम, खोपोली

 
श्री गगनगिरी महाराज हे एक सिद्ध पुरुष आहेत. त्यांनी खोपोली येथील पातळगंगा नदी मध्ये तपश्चर्या केली आहे. या तपश्चर्ये मध्ये त्यांना त्याचा पाय गमवावा लागला होता.
खोपोली हे रायगड जिल्हातील पुण्याच्या दिशेचे शेवटचे शहर. भौगोलिक दृष्ट्या खूपच छान, नयनरम्य, निसर्गरम्य, अप्रतिम असे ठिकाण. जसे खोपोली श्री गगनगिरी महाराज आश्रमासाठी प्रसिद्ध आहे, तसेच ते त्याला निसर्गाने दिलेल्या अनमोल खाजीण्यामुळे देखील तेवेढेच प्रसिद्ध आहे. हा खजिना म्हणजे, येथील पावसामधले पाण्याचे धबधबे. मुंबई पुणे जुन्या रस्त्या वरून पुण्याच्या दिशेने जाताने खूपच मनमोहक असे दृश्य ह्या धबधब्यांचे दिसते. असो कधी येथे आलात तर पावसाळी सहल जरूर करा.
खोपली हे मुंबई लोकल ट्रेन च्या मध्य किंव्हा मेन लाईन वरचे शेवटचे स्टेशन आहे. कल्याण रेल्वे स्टेशनहून मध्य रेल्वेचे दोन फाटे फुटतात एक कसाऱ्याकडे जातो तर दुसरा कर्जत-खोपोली कडे जातो. तर कर्जत-खोपोली लाईन वरील खोपोली हे अगदी शेवटचे स्थानक होय.
खोपोली रेल्वे स्थानकाहून श्री गगनगिरी महाराजांचा आश्रम एक कि.मी. लांब असावा. तर तुम्ही चालत हि अगदी सहजपणे जाऊ शकता. किंव्हा स्थानका बाहेरून आश्रामापार्येंत जाण्यासाठी रिक्षा हि भेटते.
मंदिराचे भव्य प्रवेशद्वार पाहूनच मन अगदी प्रसन्न होऊन जाते. मंदिरात आतमध्ये गेल्यावर प्रथम आपणास आपले नाव, गाव याचा तपशील प्रवेशद्वाराजवळ द्यावा लागतो. नंतर आतमध्ये पादुका/जोडे (चप्पल किंव्हा शूज) काढण्याची सोय आहे. लगेच थोडे बाजूस पाय धुण्याची सोय आहे, तर हात-पाय धुवूनच आतमध्ये जावे. आतमध्ये गेल्यावर भव्य असा सभा मंडप आहे. तेथे गगनगिरी महाराजांची प्रतिमा आहे. व डाव्या बाजूस मंदिराच्या परिसरातच पाताळगंगा नदी आहे. नदी काठी बसायला घाट बनवला आहे. ते दृश्य बघून, त्या घाटावर बसून पाण्यात पाय सोडून बसण्याचा मोह आपण आवरू शकत नाही. थोडा वेळ येथे घालवल्यावर, येथून आतमध्ये छान से गगनगिरी महाराजांचे अजून एक मंदिर आहे. तेथून बाहेर उजव्या बाजूस आणखी एक मंदिर आहे तेथे सर्व संतांच्या मूर्ती आहेत. ह्या मंदिराच्या बाजूस मनमोहक अशी दाट फळबाग आहे, त्यामुळे येथे खूप थंड, शांत असे वातावरण आहे. आपण ह्या संत मंदिरात गेल्यास येथून बेर येवू नये असे वाटते. थोडा वेळे येथे घालवल्यावर येथून बाहेर जाण्यास एक वाट आहे. वाटेत नदीहून जाण्यासाठी एक छोटासा पूल (ब्रिज) बदला आहे. हे आणखी एक येथील आकर्षण आहे. पुलाच्या पलीकडे खूपच मोठा एक बगीचा आहे. हा बगीचा हि इतका नयनरम्य आहे कि येथून प्पुथे जाण्याची तुमची इच्छाच होणार नाही. तर येथे हि थोडा वेळ घालवून पुढे जावे. पुढे समोरच एक मोठा डोंगर दिसतो. थोडे बराकाईने पहिले तर थोड्या वर अंतरावर एक भगव्या रंगाचे निशाण (झेंडा) दिसतो. तिथे गगनगिरी महाराजांची गुहा आहे. महाराज येथे जात असत. ह्या बगिच्या मधून येथे जाण्यास एक पक्का रस्ता (डांबरी) आहे. तर वेळ मिळाल्यास येथे जरूर जावे. शक्यतो सकाळी लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करावा, जेणे करून मठातील सर्व स्थळे बघावयास मिळतील.

    बगिच्या मधून वर डांबरी रस्त्याने गेल्यावर २० मिनिटात गुहा येईल. गुहेत हि खूप आल्हाददायक, प्रसन्न वातावरण आहे. गुहेत जातेक्षणी वर चढून यायला जो थकवा आला असेल, तो थकवा तेथील प्रसन्न वातावरण बघून क्षणार्धात निघून जाईल. गुहेच्या द्वारातून बाहेर बघितल्यास छानसे खोपोली शहर दिसेल. आपल्या सवडीनुसार थोडा वेळ येथे घालवल्यावर, पुन्हा खाली मठाच्या आवारात यावे. इच्छा असल्यास आणखी थोडा वेळ येथे व्यतीत करू शकता. व खूपच प्रसन्न मनाने घरी जावू शकता.


जर आपण हि असा अनुभव गगनगिरी महाराजांच्या आश्रमात घेतला असेल तर खाली कॉमेंट (comment) करून आवश्य कालवा.
किंव्हा काही सांगावयास विसरलो असेन तर जरूर कळवा.

१८ जुलै २०२१ दिनविशेष

 🚩॥ ॐ॥🇮🇳

सुप्रभात 🌞

🌝आजचे पंचांग🌚

🚩युगाब्द ५१२३

🚩विक्रम संवत्सर २०७७

🚩शालिवाहन संवत् १९४३

🚩शिव संवत् ३४८

🚩संवत्सर : प्लव नाम 

🚩आषाढ शुक्ल पक्ष नवमी

🚩नक्षत्र : स्वाती

🚩ऋतूः ग्रीष्म

🚩सौर ऋतूः वर्षा

🚩आयनः दक्षिणायन

🚩सूर्योदय : सकाळी ०६.१०

🚩सूर्यास्त : सायंकाळी ०७.१९

🚩राहुकाळ : सायंकाळी ०५.४० ते ०७.१८

🚩सौर आषाढ : २७

🚩वार : रविवार 

🚩 १८ जुलै २०२१

📺 दिन विशेषः-

🚩आज लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मृतिदिन आहे

🚩मुंबई विद्यापीठाची स्थापना *१८५७* 

🚩भारताने एस. एल. व्ही.-३ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले *१९८०* 

🚩उद्योगपती गोदरेज यांना जपानचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा पुरस्कार प्रदान केला *१९९६* 

💐जन्मदिन 💐

🚩कवी व समीक्षक बिष्णु डे

🚩उद्योजिका दप्तेंद प्रमानिक

🚩६९वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती

🛑स्मृतिदिनः-  

🚩भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक डॉ. गोविंद भट 

🚩सांगलीच्या राजमाता पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन

🚩अभिनेते राजेश खन्ना

🚩कवी, गीतकार व अभिनेते वाली

🚩शुभ दिवस 

🚩आजचा दिवस मंगलमय जावो🚩

🚩भारत माता की जय🚩

🚩वंदे मातरम्🚩

श्री महालक्ष्मीची आरती

 

||श्री||

||श्री गणेशाय नमः||

||श्री महालक्ष्मीची आरती||










जय देवी जय देवी जय महालक्ष्मी | वससी व्यापक रूपे तू स्थुलसुक्ष्मी ||


करवीरपूरवासिनी सुरवरमुनीमाता | पुरहर वरदायिनी मुरहर प्रीयकांता ||


कमलाकरे जठरी जन्म्विला धाता | सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ||


मातुलिंग गदा खेटक रविकिरणी | झळके हाटक-वाटी पियुषरसपाणी ||


माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी | शशिकरवदना राजस मदनाची जननी ||


तराशक्ती अगम्य शिवभजका गौरी | सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी ||


गायत्री निजाबिजा निगमागम सारी | प्रकटे पद्मावती नीजधर्माचारी ||


अमृतभरिते सरिते अघदुरीते वारी | मारी दुर्घट असुरां भव दुस्तर तारी ||


वारी मायापटल प्रणमत परीवारी | हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी ||


चातुरानने कुच्वित कर्माच्या ओळी | लिहिल्या असतील माते माझे निजाभाळी ||


पुसोनी चरणतळी पद्सुने क्षाळी | मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी ||


जय देवी जय देवी जय महालक्ष्मी | वससी व्यापक रूपे तू स्थुलसुक्ष्मी ||



🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री महालक्ष्मी अष्टकम

 

||श्री||

||श्री गणेशाय नमः||

||श्री महालक्ष्मी अष्टकम||

(इंद्र उच्छाव)





नमस्तेस्तु महामाये, श्रीपिठे सूरपुजिते | शंकचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ||१||


नमस्ते गरुडारुडे, कोल्हासुरभयंकरी | कुमारी वैष्णवी ब्राम्ही, महालक्ष्मी नमोस्तुते ||२||


सर्वज्ञे, सर्ववरदे, सर्वद्रुष्टभयंकरी | सर्वदुखः हरे देवि, महालक्ष्मी नमोस्तुते ||३||


सिध्दीबुध्दीप्रदे देवि भुक्तीमुक्तीप्रदायीनी | मंत्रमुर्ते सदा देवि, महालक्ष्मी नमोस्तुते ||४||


आद्यंन्तरहिते देवि, आद्यशक्ती महेश्वरी | योगजे योगसंभूते, महालक्ष्मी नमोस्तुते ||५||


स्थुलसुक्ष्मेमहारौद्रे महाशक्ति महोदरे | महापाप हरे देवि, महालक्ष्मी नमोस्तुते ||६||


पद्मासनस्थिते देवि, परब्रम्हस्वरूपिणी | परमेशी जगन्मातमहालक्ष्मी नमोस्तुते ||७||

श्वेतांबरधरे देवि नानालंकारभूषिते | जगस्थिते जगन्मात महालक्ष्मी नमोस्तुते ||८||




🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री मनाचे श्लोक १९१ ते २०५


।।श्री।।

।।श्री राम समर्थ।।

।।जय जय रघुवीर समर्थ।।














देहेबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना ।

तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना ।।

परब्रम्ह तें मीपणे आकळेना ।

मनी शून्य अज्ञान हे मावळेना ।।१९१।।


मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे ।

दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचे ।।

तया खूण ते हीन दृष्टांत पाहे ।

तेथे संग निसंग दोन्ही न साहे ।।१९२।।


नव्हे जाणता नेणता देवराणा ।

न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा ।।

नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा ।

श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ।।१९३।।


वसे हृदयीं देव तो कोण कैसा ।

पुसे आदरे साधकु प्रश्न ऐसा ।

देहे टाकिता देव कोठें पाहतो ।

परि मागुता ठाव कोठे रहातो ।।१९४।।


वसे हृदयी देव तो जाण ऐसा ।

नाभाचेपरी व्यापकु जाण तैसा ।।

सदा संचाला येत ना जात काही ।

तयावीण कोठे रिता ठाव नाही ।।१९५।।


नभी वावरे जो अणुरेणू काही ।

रिता ठाव या राघवेवीण नाही ।।

तया पाहता पाहता तेचि झाले ।

तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले ।।१९६।।


नाभासारिखे रूप या राघवाचे ।

मनीं चिंतिता मूळ तुटे भवाचे ।।

तया पाहता देहबुद्धी उरेना ।

सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना ।।१९७।।


नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे ।

रघूनायका उपमा ते न साहे ।।

दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे ।

तया व्यापकु व्यर्थ कैसे म्हणावे ।।१९८।।


अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे ।

तेथे तर्क संपर्क तोही न साहे ।।

अति गूढ तें दृश्य तत्काळ सोपे ।

दुजेवीण जे खुण स्वामीप्रतापें ।।१९९।।


कळे आकळे रूप ते ज्ञान होता ।

तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था ।।

मनी  उन्मनी शब्द कुंठित राहे ।

तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहे ।।२००।।


कदा ओळखीमाजी दुजे दिसेना ।

मनी मानसी द्वैत काही वसेना ।।

बहुता दिसा आपली भेट जाली ।

विदेहीपणें सर्व काया निवाली ।।२०१।।


मना गुज रे तुज हे प्राप्त झाले ।

परी अंतरी पाहिजे यत्न केले ।।

सदा श्रवणें पाविजे निश्चयासी ।

धरी सज्जन संगती धन्य होसी ।।२०२।।


मना सर्वही संग सोडूनि द्यावा ।

अति आदरे सज्जनाचा धरावा ।।

जयाचेनि संगे महादुःख भंगे ।

जनीं साधनेवीण सन्मार्ग लागे ।।२०३।।


मना  संग हा सर्व संगास तोडी ।

मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी ।।

मना संग हा साधना शीघ्र सोडी ।

मना संग हा द्वैत निःशेष मोडी ।।२०४।।


मनाची शते ऐकता दोष जाती ।

मती मंद ते साधना योग्य होती ।।

चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ।

म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी ।।२०५।।



।। जय जय रघुवीर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री मनाचे श्लो १८१ ते १९०


।। श्री ।।

।। श्री राम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।













 नव्हे चेटकी चाळकु द्रव्यभोंदु ।

नव्हे निंदकू मत्सरू भक्तीमंदू ।।

नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू ।

जनीं ज्ञानिया तोचि साधू अगाधु ।।१८१।।


नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी ।

क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी ।।

मुखे बोलिल्यासारिखे चालताहे ।

मना सद्गुरू तोचि शोधूनि पाहे ।।१८२।।


जनीं भक्ती ज्ञानी विवेकी विरागी ।

कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी ।।

प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे ।

तयाचेनि योगे समाधान बाणे ।।१८३।।


नव्हे तेचि जाले नसे तेचि आले ।

कळों लागले सज्जनाचेनि बोलें ।।

अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे ।

मना संत आनंत शोधीत जावे ।।१८४।।


लपावे अति आदरे रामरूपी ।

भयातीत निश्चित ये स्वस्वरुपी ।।

कदा तो जनीं पाहताही दिसेना ।

सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना ।।१८५।।


सदा सर्वदा राम सन्निध आहे ।

मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ।।

अखंडित भेटी रघूराजयोगू ।

मना सांडी रे मीपणाचा वियोगु ।।१८६।।


भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे ।

परी सर्वही स्वस्वरुपी न साहे ।।

मना भासले सर्व काही पाहावे ।

परी संग सोडूनि सुखि राहावे ।।१८७।।


देहेभान हे ज्ञानशास्त्रे खुडावे ।

विदेही पणे भक्तिमार्गेचि जावे ।।

विरक्तीबळें निंद्य सर्वे त्यजावे ।

परी संग सोडूनि सुखि राहावे ।।१८८।।


मही निर्मिली देव तो ओळखावा ।

जया पाहता मोक्ष तत्काळ जिवा ।।

तया निर्गुणालागी गुणी पाहावे ।

परी संग सोडूनि सुखि राहावे ।।१८९।।


नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टीभर्ता ।

परेहुन पर्ता न लिंपे विवर्ता ।।

तया निर्विकल्पासी कल्पित जावे ।

परी संग सोडूनि सुखि राहावे ।।१९०।।


।। जय जय रघुवीर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...