जपमाळेमध्ये १०८ मनी का असतात?

जपमाळेमध्ये १०८  मनी का असतात?

 


नमस्कार मंडळी,

 

आपणांस कधी  प्रश्न पडला आहे का, की जपमाळेमध्ये १०८ मनी का असतात?

१००, ५०, २००, १००० असे का नसतात?

ह्या १०८  संखे मागे काही शास्त्रीय कारणं आहेत. आपल्या धर्मामध्ये प्रत्येक गोष्ट काही ना काही कारणामुळेच बनलेली आहे. जगामध्ये प्रत्येक गोष्ट घडते त्यामागे काही ना काहीतरी कारण असतेच  असते.

तसेच देवाच्या नामस्मरणासाठी वापरली जाणारी जपमाळ त्यामध्ये १०८  मनी का असतात यालाही काही विशिष्ट कारणे आहेत.

त्यापैकी काहि कारणं  खाली नमूद केली आहेत:

 

. आपल्या सूर्यमालेत ९ ग्रह आहेत आणि आपल्या हिंदू पंचांगानुसार १२ राशी आहेत, जर आपण ९ गुणिले १२ असं केलं तर आपल्याला १०८  ही संख्या मिळते. त्यामुळे १२ राशी व ९ ग्रह यांच्या संख्येनुसार १०८  वेळा देवाचे नामस्मरण करावे  अशी धारणा आहे.

 

. दुसरे कारण असे की, आपल्या हिंदू पंचांगानुसार २७  नक्षत्र आहेत व प्रत्येक नक्षत्राचे ४ चरण आहेत, जर आपण २७  गुणिले ४  असं केलं तर १०८ असे उत्तर मिळते म्हणून जपमाळेमध्ये १०८  मनी असतात  अशी धारणा आहे.

 

त्यामुळे आपण  ज्या देवाचे नामस्मरण करतो, ती आपली इष्ट देवता व ९ ग्रह, १२ राशी,  तसेच २७  नक्षत्र व त्यांचे ४ चरण हे आपल्या कुंडलीवर  उत्तम प्रभाव टाकतात व आपली संकटे, अडथळे, व्यथा दूर होतात अशी धारणा आहे.

अशा धारणेनुसार जपमाळेतील मण्यांची संख्या १०८  अशी ठेवण्यात आलेली आहे असा समज आहे.






अधिकमास माहात्म्य पोथी भाग ४ (७६ ते १११ ओव्या)

 

अधिकमास माहात्म्य पोथी (भाग )

 




पोपट तो पूर्वजन्मीचा | पुत्र असे शुकदेव तुमचा ||

संदेश दिला कल्याणाचा | लक्षात ठेवावा आपण ||७६||

 

ऐहिक सुखावर सोडून पाणी | साम्राज्य पदि पुत्रास बैसवूनी ||

दोघे गेले तपोवनी | अधिकमास व्रत करण्या ||७७||

 

त्यांच्या व्रताने होऊनी प्रसन्न | गोलोकात दिले स्थान ||

स्वतःस्वये नेले त्यांस | श्रीकृष्णाने ||७८||

 

पुराणकथा अनेक असती |  जे अधिकमास वृत्त आचारती ||

त्यांचे महात्म्य सांगतो मी | लक्ष देऊन ऐकावे ||७९||

 

आता ऐकावी दीपदानाची कथा |  त्याने दूर होती सर्व व्यथा ||

दानाचे कोणते पुण्य पदरी पडते |  ते आता सांगतो मी ||८०||

 

मणिग्रीव नामे व्यापारी श्रीमंत |  राहत होता चमत्कार नगरीत ||

भार्या  त्याची साध्वी  व सद्गुणी |  ती होती नामे सुंदरी ||८१||

 

धनसंपत्तीच्या जोरावर |  मणिग्रीव करीत असे अत्याचार ||

वाईट त्याची वर्तणूक |  नको नको ती कर्मे करीत ||८२||

 

छळाला त्याच्या लोक कंटाळले |  राजाने त्याची हाकलून लावले ||

गेले दोघे सोडून नगरी |  हाल  अपेष्टा आल्या पदरी ||८३||

 

पत्नी होती धीराची |  साध्वी आणि समाधानी ||

वारंवार करता उपदेश |  पश्चाताप झाला मणिग्रीवास ||८४||

 

उग्रदेव नामे तपस्वी |  जात होते प्रयाग तिरी ||

व्याकुळ होता तहान भुकेने |  मूर्च्छा येउनी भूवरी पडले ||८५||

 

या दोघांनी घरी आणूनी |  सेवा केली मनापासुनी ||

ऐकुनी त्यांची सारी व्यथा |  सांगितली पुरुषोत्तम वृत्तकथा ||८६||

 

अधिकमासात उभयतांनी |  अखंड दीप व्रत  आचरुनी  ||

प्रसन्न केले पुरुषोत्तमासी |  लावूनी नंदादीपा ||८७||

 

याच कारणे पुढील जन्मी | राजवैभव प्राप्त होऊनी ||

चंद्रकलेसह सुखी जाहले |  चित्रबाहू राजा ||८८||

 

आणि एक कथा ऐका |  कर्दम नामे ब्राह्मणाची एका ||

त्याची उजळली भाग्यरेखा |  पुरुशोत्तमाच्या व्रतामुळे ||८९||

 

एक होता महालोभी ब्राह्मण  |  नित्य करी असत्य भाषण ||

स्वार्थी मित्रद्रोही कृपण |  केवळ द्रव्य लोभापायी ||९०||

 

त्याच्या पापाचा घडा भरला |  शूद्र वानराचा जन्म लाभला ||

पुरुषोत्तम व्रताचा उपवास घडला |  कर्मधर्म संयोगाने ||९१||

 

जलाशयावर स्नान  घडले |  पुरुषोत्तम व्रत पूजन दिसले ||

अगणित पुण्य प्राप्त झाले |  गेला तो विष्णूलोकी ||९२||

 

अप्सरा स्मित विलासिनी |  दुर्वास ऋषींची थट्टा करुनी ||

त्यांच्या शापे पिशाच्च होऊनी |  भटकत राहिली रानोमाळी ||९३||

 

एक तपस्वी तिला भेटले |  अधिकमास व्रत करण्या सांगितले ||

त्या योगे पिषाचीनीला |  पुन्हा अप्सरा रूप प्राप्त झाले ||९४||

 

अधिक महिन्याच्या दोन पक्षी |  येतात दोन शुभ एकादशी ||

पहिलीचे नाम पद्मिनी |  दुसरी ती परमा असे||९५||

 

ज्यांना नसेल शक्य जाण |  पूर्ण महिन्याचे व्रताचरण ||

त्यांनी त्या दोन एकादशी |  पाळाव्यात किमान  पक्षी ||९६||

 

येता महिन्याचा शेवटचा दिवस |  श्रीकृष्ण पूजन करून खास ||

करावे अधिकमासाचे उद्यापण |  आपल्या शक्यतेने नुसार ||९७||

 

फापट  पसारा सर्व टाळावा |  उगीच डामडौल नसावा ||

मुख्य विधी फक्त आचरावा |  केवळ श्रद्धा असावी ||९८||

 

मूर्ती किंवा तसबीर मांडून |  यथासांग करावे पूजन ||

साष्टांग नमस्कार घालूनी |  प्रार्थना करावी मनोमनी ||९९||

 

देवा ही पूजा अंगीकारूनी |  अपराधांची क्षमा करूनी ||

अजाण बालक मज समजुनी |  कृपा करी मज  लागुनी ||१००||

 

शेवटी महानैवेद्य समर्पितावा  |  आधी गोग्रास वाढावा ||

मग जेवावे आपण |  प्रसन्न  चित्ते  ||१०१||

 

घास घेता मुखानी |  मौन पाळावे भोजनी ||

प्रत्येक घासा  सवे |  गोविंद गोविंद म्हणावे ||१०२||

 

वृत्ती सदा  उदार ठेवावी |  गोरगरिबांस भिक्षा द्यावी ||

अनाथ अपंगांची दया करावी |  सत्पात्री दान द्यावे ||१०३||

 

दोन ब्राह्मणांना बोलवावे |  विष्णू आणि कृष्ण त्यांना समजावे ||

दक्षिणा देऊन पूजा करावी |  एक  एक पोथी भेट द्यावी ||१०४||

 

अधिकमासाचे महत्त्व अपार |  पुरुषोत्तम व्रताचे पुण्य थोर ||

न करता ग्रंथ विस्तार |  संक्षेपे कथा सांगितल्या ||१०५||

  

हे व्रत करिता सुवासिनींनी |  सौभाग्य प्राप्त होईल त्यांना ||

व्रत करिता कुमारिकांनी |  भाग्यवंत पती मिळेल ||१०६||

 

लग्नार्थीयाचे व्हावे लग्न |  धनार्थीयाचे व्हावे धन ||

विद्यार्थ्यांना विद्या प्राप्ति |  मोक्षयार्थ्यांना मोक्षप्राप्ती होईल ||१०७||

 

अधिकमासात दैनंदिन |  पोथीचे करावे पारायण ||

श्रवण अथवा पठण करूनी |  पुण्य पदरी पडेल ||१०८||

 

श्रीविष्णूंनी नारदांना | श्रीकृष्णाने पांडवांना ||

सुतांनी सर्व ऋषीमुनींना |  पुरुषोत्तम व्रत सांगितले ||१०९||

 

महात्म्य थोर अधिकमासाचे |  खरोखर फलदायक असे ||

लहान  थोर गरीब  श्रीमंत |  सर्वांना सारखेच मिळते फळ ||११०||

 

अधिकमास हा पुण्य  पावन |  हरतील पापे कथा ऐकून ||

पुरुषोत्तम वरदहस्त लाभ |  सार्थक होईल जन्माचे ||१११||

 

||  इति  श्री अधिकमास महात्म्य संपूर्णम  ||

|| श्रीकृष्णपर्णमस्तु ||

||  शुभं भवतु ||

अधिकमास माहात्म्य पोथी भाग ३ (५१ ते ७५ ओव्या)


अधिकमास माहात्म्य पोथी (भाग ३)



धृपद राजाच्या यज्ञकुंडी प्रगट झाली पुढील जन्मी ||

आज्ञा होता कुंती ची |  पत्नी झाली पाच पांडवांची ||५१||

 

पूर्व  जन्मीच्या अपराधांचे फळ |  भोगावे लागले द्रोपतीस  ||

पांच पांडवांसवे तिच्या |  नशिबी आला वनवास ||५२||

 

ऐकुनी द्रौपदीच्या |  पूर्वजन्मीची कहानी ||

धर्मराज म्हणती |  आता तूच  तार यातुनी चक्रपाणी ||५३||

 

श्रीकृष्ण सांगती धर्मराजाला |  आता पुरुषोत्तम मास जरी येता ||

स्नान, दान, सत्कर्मे करिता |  पुण्य पदरी पडेल आता ||५४||

 

पांडवांनी व्रत आचरिता |  नशिबाचा वनवास संपला ||

युद्धात विजय होता |  गत  साम्राज्य आले हाता ||५५||

 

पुरुषोत्तमाचे व्रत घडले |  कोणास कसे फळ मिळाले ||

शास्त्रीबुवांनी ते सांगितले |  विविध कथा त्या ऐकाव्या ||५६||

 

सुदेव  नामे ब्राह्मण कोणी |  गौतमी त्याची भार्या गुणी ||

ताम्रपर्णी तटी आश्रमी |  द्रविड देशी राहातसे ||५७||

 

दोघे करिती श्रीविष्णू पूजन |  नवस  सायास केले अपार ||

परी पोटी पुत्र नसे त्यांच्या |  उदास होती मग उभयता ||५८||

 

खडतर तपश्चर्या करूनी |  विष्णूशी घेतले प्रसन्न करूनी ||

काय हवे ते माग तू वत्सा |  तुजवरी मी प्रसन्न असे ||५९||

 

पुत्र सुख द्यावे भगवंता |  त्याखेरीज मागणी नाही आता ||

वंशदीप  उजळावा माझा |  एकतरी पुत्र व्हावा मला ||६०||

 

दैवगती ही असे विचित्र |  नशिबी तुझ्या नाही पुत्र ||

दुसरे काही मागणे सांग |  मी देण्या समर्थ असे ||६१||

 

सुदेव पडला होऊनी मूर्तीत |  नाही पोटी संतान सुख ||

समजावीत गौतमी त्यास |विधिलिखित वेगळे असे ||६२||

 

विष्णूच्या आज्ञेवरूनी | गरुडाने केली कृपा ||

त्यांच्या पोटी पुत्र जन्मा आला |  त्याचे नाव शुकदेव ||६३||

 

आता होईल पुत्र  लाभ |  परी नशिबी आहे पुत्रवियोग ||

देव आणि दैव दोन्ही असे श्रेष्ठ |  ऐसे गरुड बोलीला ||६४||

 

सुदेव गौतमी हर्षयुक्त मनाने |  काळ कंठीत आनंदाने ||

वेदविद्या, शास्त्राभ्यासात  |  केले पारंगत पुत्रास ||६५||

 

बारा वर्षांचा काळ लोटला |  विहिरीवर पोहण्यास गेला ||

जलक्रीडा करतांना त्याला |  बुडून मृत्यू आला ||६६||

 

मृत पुत्राचे कलेवर |  घेऊन बैसले मांडीवर ||

शोक करिती अपार |  सुदाम, गौतमी ||६७||

 

उपास घडला महिनाभर |  त्यात पावसाची संततधार ||

तो होता अधिकमास |  नकळत घडले व्रतास ||६८||

 

प्रसन्न झाला पुरुषोत्तम |  फळ मिळाले उत्तम ||

शुक देवास करुनी जिवंत |  सुदेव गौतमी झाले आनंदित ||६९||

 

पुत्र, पौत्रादि सुखे भोगुनी |  सुदेव, गौतमी निवर्तले ||

पुढील जन्मी दोघेजण |  राज्य पदी बसले ||७०||

 

दृढ धनवा, नामे नृपती |  गौतमी नामे गुनसुंदरी ||

हैह्या देशाच्या सम्राटपदी |  झाले विराजमान दोघेजण ||७१||

 

एकदा राजा वनात गेला |  विश्रांतीसाठी क्षणभर विसावला ||

पोपोट फांदीवर बसून बोलला |  राजा सांगतो ते ऐका जरा ||७२||

 

संसारी या ऐहिक  सुखे  |  देतील तुजला अंती दुःखे ||

न मिळे अंतरी समाधान |  तरी सत्कर्मे ती करावी  जाण ||७३||

  

एवढे सांगून पोपोट गेला उडूनी | राजा उठला नवस करूनी ||                                     

अहर्निश चालले चिंतन |  पोपटाच्या उपदेशाचे ||७४||

 

एके दिनी वाल्मिकी ऋषींनी |  सांगितली कथा पूर्वजन्माची ||

नकळत घडले अधिकमास  व्रत |  तुम्हावरी कृपा करी भगवंत  ||७५||

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...