।। श्री ।।
।। श्रीराम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
।। श्री मनाचे श्लोक ९१ ते १०० ।।
नको
वीट मानू रघुनायकाचा ।
अती
आदरे बोलिजे राम वाचा ।
न
वेचे मुखी सापडे रे फुकाचा ।
करी
घोष त्या जानकीवल्लभाचा ।। ९१ ।।
अती
आदरे सर्वही नामघोषे ।
गिरिकंदरे
जाईजे दूरी दोषे ।।
हरी
तिष्ठतू तोषला नामतोषे ।
विशेषे
हरा मानसी रामपीसे ।। ९२ ।।
जगी
पाहता देव हा अन्नदाता ।
तया
लागली तत्त्वता सार चिंता ।।
तयाचे
मुखी नाम घेता फुकाचे ।
मना
सांग पां रे तुझे काय वेचे ।। ९३ ।।
तिन्ही
लोक जाळू शके कोप येता ।
निवाला
हरू तो मुखे नाम घेता ।।
जपे
आदरे पार्वती विश्वमाता ।
म्हणोनि
म्हणा तेचि हे नाम आता ।। ९४ ।।
अजामेळ
पापी वदे पुत्रकामे ।
तया
मुक्ति नारायणाचेनि नामे ।।
शुकाकारणे
कुंटणी राम वाणी ।
मुखे
बोलता ख्याति जाली पुराणी ।। ९५ ।।
महाभक्त
प्रल्हाद हा दैत्यकूळी ।
जपे
रामनामावळी नित्यकाळी ।।
पिता
पापरूपी तया देखवेना ।
जनी
दैत्य तो नाम मूखे म्हणेना ।। ९६ ।।
मुखी
नाम नाही तया मुक्ति कैची ।
अहंतागुणे
यातना ते फुकाची ।।
पुढे
अंत येईल तो दैन्यवाणा ।
म्हणोनी
म्हणा रे म्हणा देवराणा ।। ९७ ।।
हरीनाम
नेमस्त पाषाण तारी ।
बहू
तारिले मानवदेहधारी ।।
तया
रामनामी सदा जो विकल्पी ।
वदेना
कदा जीव तो पापरूपी ।। ९८ ।।
जगी
धन्य वाराणसी पुण्यरासी ।
तयेमाजि
जाता गती पूर्वजांसी ।।
मुखे
रामनामावळी नित्यकाळी ।
जिवा
हीत सांगे सदा चंद्रमौळी ।। ९९ ।।
यथासांग
रे कर्म तेही घडेना ।
घडे
कर्म ते पुण्य गांठी पडेना ।।
दया
पाहता सर्वभूती असेना ।
फुकाचे
मुखी नाम तेही वसेना ।। १०० ।।
।। जय जय रघुविर समर्थ ।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


