श्री महालक्ष्मीची आरती

 

||श्री||

||श्री गणेशाय नमः||

||श्री महालक्ष्मीची आरती||










जय देवी जय देवी जय महालक्ष्मी | वससी व्यापक रूपे तू स्थुलसुक्ष्मी ||


करवीरपूरवासिनी सुरवरमुनीमाता | पुरहर वरदायिनी मुरहर प्रीयकांता ||


कमलाकरे जठरी जन्म्विला धाता | सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ||


मातुलिंग गदा खेटक रविकिरणी | झळके हाटक-वाटी पियुषरसपाणी ||


माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी | शशिकरवदना राजस मदनाची जननी ||


तराशक्ती अगम्य शिवभजका गौरी | सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी ||


गायत्री निजाबिजा निगमागम सारी | प्रकटे पद्मावती नीजधर्माचारी ||


अमृतभरिते सरिते अघदुरीते वारी | मारी दुर्घट असुरां भव दुस्तर तारी ||


वारी मायापटल प्रणमत परीवारी | हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी ||


चातुरानने कुच्वित कर्माच्या ओळी | लिहिल्या असतील माते माझे निजाभाळी ||


पुसोनी चरणतळी पद्सुने क्षाळी | मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी ||


जय देवी जय देवी जय महालक्ष्मी | वससी व्यापक रूपे तू स्थुलसुक्ष्मी ||



🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री महालक्ष्मी अष्टकम

 

||श्री||

||श्री गणेशाय नमः||

||श्री महालक्ष्मी अष्टकम||

(इंद्र उच्छाव)





नमस्तेस्तु महामाये, श्रीपिठे सूरपुजिते | शंकचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ||१||


नमस्ते गरुडारुडे, कोल्हासुरभयंकरी | कुमारी वैष्णवी ब्राम्ही, महालक्ष्मी नमोस्तुते ||२||


सर्वज्ञे, सर्ववरदे, सर्वद्रुष्टभयंकरी | सर्वदुखः हरे देवि, महालक्ष्मी नमोस्तुते ||३||


सिध्दीबुध्दीप्रदे देवि भुक्तीमुक्तीप्रदायीनी | मंत्रमुर्ते सदा देवि, महालक्ष्मी नमोस्तुते ||४||


आद्यंन्तरहिते देवि, आद्यशक्ती महेश्वरी | योगजे योगसंभूते, महालक्ष्मी नमोस्तुते ||५||


स्थुलसुक्ष्मेमहारौद्रे महाशक्ति महोदरे | महापाप हरे देवि, महालक्ष्मी नमोस्तुते ||६||


पद्मासनस्थिते देवि, परब्रम्हस्वरूपिणी | परमेशी जगन्मातमहालक्ष्मी नमोस्तुते ||७||

श्वेतांबरधरे देवि नानालंकारभूषिते | जगस्थिते जगन्मात महालक्ष्मी नमोस्तुते ||८||




🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री मनाचे श्लोक १९१ ते २०५


।।श्री।।

।।श्री राम समर्थ।।

।।जय जय रघुवीर समर्थ।।














देहेबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना ।

तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना ।।

परब्रम्ह तें मीपणे आकळेना ।

मनी शून्य अज्ञान हे मावळेना ।।१९१।।


मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे ।

दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचे ।।

तया खूण ते हीन दृष्टांत पाहे ।

तेथे संग निसंग दोन्ही न साहे ।।१९२।।


नव्हे जाणता नेणता देवराणा ।

न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा ।।

नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा ।

श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ।।१९३।।


वसे हृदयीं देव तो कोण कैसा ।

पुसे आदरे साधकु प्रश्न ऐसा ।

देहे टाकिता देव कोठें पाहतो ।

परि मागुता ठाव कोठे रहातो ।।१९४।।


वसे हृदयी देव तो जाण ऐसा ।

नाभाचेपरी व्यापकु जाण तैसा ।।

सदा संचाला येत ना जात काही ।

तयावीण कोठे रिता ठाव नाही ।।१९५।।


नभी वावरे जो अणुरेणू काही ।

रिता ठाव या राघवेवीण नाही ।।

तया पाहता पाहता तेचि झाले ।

तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले ।।१९६।।


नाभासारिखे रूप या राघवाचे ।

मनीं चिंतिता मूळ तुटे भवाचे ।।

तया पाहता देहबुद्धी उरेना ।

सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना ।।१९७।।


नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे ।

रघूनायका उपमा ते न साहे ।।

दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे ।

तया व्यापकु व्यर्थ कैसे म्हणावे ।।१९८।।


अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे ।

तेथे तर्क संपर्क तोही न साहे ।।

अति गूढ तें दृश्य तत्काळ सोपे ।

दुजेवीण जे खुण स्वामीप्रतापें ।।१९९।।


कळे आकळे रूप ते ज्ञान होता ।

तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था ।।

मनी  उन्मनी शब्द कुंठित राहे ।

तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहे ।।२००।।


कदा ओळखीमाजी दुजे दिसेना ।

मनी मानसी द्वैत काही वसेना ।।

बहुता दिसा आपली भेट जाली ।

विदेहीपणें सर्व काया निवाली ।।२०१।।


मना गुज रे तुज हे प्राप्त झाले ।

परी अंतरी पाहिजे यत्न केले ।।

सदा श्रवणें पाविजे निश्चयासी ।

धरी सज्जन संगती धन्य होसी ।।२०२।।


मना सर्वही संग सोडूनि द्यावा ।

अति आदरे सज्जनाचा धरावा ।।

जयाचेनि संगे महादुःख भंगे ।

जनीं साधनेवीण सन्मार्ग लागे ।।२०३।।


मना  संग हा सर्व संगास तोडी ।

मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी ।।

मना संग हा साधना शीघ्र सोडी ।

मना संग हा द्वैत निःशेष मोडी ।।२०४।।


मनाची शते ऐकता दोष जाती ।

मती मंद ते साधना योग्य होती ।।

चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ।

म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी ।।२०५।।



।। जय जय रघुवीर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री मनाचे श्लो १८१ ते १९०


।। श्री ।।

।। श्री राम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।













 नव्हे चेटकी चाळकु द्रव्यभोंदु ।

नव्हे निंदकू मत्सरू भक्तीमंदू ।।

नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू ।

जनीं ज्ञानिया तोचि साधू अगाधु ।।१८१।।


नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी ।

क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी ।।

मुखे बोलिल्यासारिखे चालताहे ।

मना सद्गुरू तोचि शोधूनि पाहे ।।१८२।।


जनीं भक्ती ज्ञानी विवेकी विरागी ।

कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी ।।

प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे ।

तयाचेनि योगे समाधान बाणे ।।१८३।।


नव्हे तेचि जाले नसे तेचि आले ।

कळों लागले सज्जनाचेनि बोलें ।।

अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे ।

मना संत आनंत शोधीत जावे ।।१८४।।


लपावे अति आदरे रामरूपी ।

भयातीत निश्चित ये स्वस्वरुपी ।।

कदा तो जनीं पाहताही दिसेना ।

सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना ।।१८५।।


सदा सर्वदा राम सन्निध आहे ।

मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ।।

अखंडित भेटी रघूराजयोगू ।

मना सांडी रे मीपणाचा वियोगु ।।१८६।।


भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे ।

परी सर्वही स्वस्वरुपी न साहे ।।

मना भासले सर्व काही पाहावे ।

परी संग सोडूनि सुखि राहावे ।।१८७।।


देहेभान हे ज्ञानशास्त्रे खुडावे ।

विदेही पणे भक्तिमार्गेचि जावे ।।

विरक्तीबळें निंद्य सर्वे त्यजावे ।

परी संग सोडूनि सुखि राहावे ।।१८८।।


मही निर्मिली देव तो ओळखावा ।

जया पाहता मोक्ष तत्काळ जिवा ।।

तया निर्गुणालागी गुणी पाहावे ।

परी संग सोडूनि सुखि राहावे ।।१८९।।


नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टीभर्ता ।

परेहुन पर्ता न लिंपे विवर्ता ।।

तया निर्विकल्पासी कल्पित जावे ।

परी संग सोडूनि सुखि राहावे ।।१९०।।


।। जय जय रघुवीर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री मनाचे श्लोक १७१ ते १८०


।। श्री ।।
।। श्री राम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।













असे सार साचार ते चोरलेसे ।

इहीं लोचनी पाहता दृश्य भासे ।।

निराभास निर्गुण तें आकळेना ।

अहंतागुणे कल्पिता हि कळेना ।।१७१।।


स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या ।

स्फुरे ब्रम्ह रे जाण माया सुविद्या ।।

मुळी कल्पना दो रूपे तेचि झाली ।

विवेके तरी स्वस्वरुपी मिळाली ।।१७२।।


स्वरूपी उदेला अहंकार राहो ।

तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो ।।

दिशा पाहता ते निशा वाढताहे ।

विवेके विचारे विवंचूनि पाहे ।।१७३।।


जया चक्षुने लक्षिता लक्षवेना ।

भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना ।।

क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो ।

दयादक्ष तो साक्षीने पक्ष घेतो ।।१७४।।


विधी निर्मिती लिहितो सर्व भाळी ।

परी लिहिता कोण त्याचे कपाळी ।।

हरू जाळितो लोक संहारकाळी ।

परी शेवटी शंकरा कोण जाळीं ।।१७५।।


जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा ।

असंख्यात संख्या करी कोण शक्रा ।।

जगी देव धुंडाळिता आढळेना ।

जगी मुख्य तो कोण कैसा कळेना ।।१७६।।


तुटेना फुटेना कदा देवराणा ।

चळेना ढळेना कदा दैन्यवाणा ।।

कळेना कळेना कदा लोचनासी ।

वसेना दिसेना जगी मीपणासी ।।१७७।।


जया मनिला देव तो पूजिताहे ।

परी देव शोधुनि कोणी न पाहे ।।

जगी पाहता देव कोट्यानुकोटी ।

जया मानली भक्ती जे तेचि मोठी ।।१७८।।


तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले ।

तया देवरायासी कोणी न बोले ।।

जगी थोरला देव तो चोरलासे ।

गुरुविण तो सर्वथाही न दिसे ।।१७९।।


गुरु पाहता पाहता लक्ष कोटी ।

बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी ।।

मनी कामना चेटके धातमाता ।

जनीं व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ।।१८०।।


।। जय जय रघुवीर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री मनाचे श्लोक १६१ ते १७०


।। श्री ।।
।। श्री राम समर्थ ।।
।। जय जय  रघुवीर समर्थ ।।






















अहंतागुणे गुणे सर्वही दुःख होते ।
मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते ।।
सुखी राहता सर्वही सुख आहे ।
अहंता तुझी तूच शोधूनि पाहे ।।१६१।।


अहंतागुणे नीती सांडी विवेकी ।
अनीतीबळें श्लाघ्यता सर्व लोकी ।।
परी अंतरी सर्वही साक्ष येते ।
प्रमाणांतरे बुद्धी सांडूनि जाते ।।१६२।।


देहेबुद्धीचा निश्चयो दृढ झाला ।
देहातीत तो हित सांडीत गेला ।।
देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी ।
सदा संगती सज्जनाची धारावी ।।१६३।।


मनें कल्पिता विषयो सोडवावा ।
मनें देव निर्गुण तो ओळखावा ।।
मनें कल्पिता कल्पना ते सरावी ।
सदा संगती सज्जनाची धारावी ।।१६४।।


देहादिक प्रपंच हा चिंतियेला ।
परी अंतरी लोभ निश्चित ठेला ।।
हरिचिंतणे मुक्तिकांता करावी ।
सदा संगती सज्जनाची धारावी ।।१६५।।


अहंकार विस्ताराला या देहाचा ।
स्रीयापुत्रमित्रादिके मोह ज्यांचा ।।
बळें भ्रांती हे जन्मचिंता हरावी ।
सदा संगती सज्जनाची धारावी ।।१६६।।


बरा निश्चयो शाश्वताचा करावा ।
म्हणे दास संदेह तो वीसरावा ।।
घडीने घडी सार्थकाची  करावी ।
सदा संगती सज्जनाची धारावी ।।१६७।।


करी वृत्ती जो संत तो संत जाणा ।
दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा ।।
उपाधी देहेबुद्धि ते वाढविते ।
परी सज्जना केवी बाधू शके ते ।।१६८।।



नसे अंत आनंत संता पुसावा ।
अहंकार विस्तार हा नीरसावा ।।
गुणेवीण निर्गुण तो आठवावा ।
देहेबुद्धीचा आठवु नाठवावा ।।१६९।।


देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी ।
विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी ।।
तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे ।
म्हणोनि सदा तेचि शोधीत जावे ।।१७०।।



।। जय जय रघुवीर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री मनाचे श्लोक १५१ ते १६०


।। श्री ।।
।। श्री राम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।






















खरे शोधीत शोधीत शोधताहे ।
मना बोधिता बोधिता बोधताहे ।।
परी सर्वही सज्जनाचेनि योगे ।
बरा निश्चयो पाविजे सानुरागें ।।१५१।।


बहुतांपरी कुसरी तत्त्वझाडा ।
परी अंतरी पाहिजे तो निवडा ।।
मना सार साचार ते वेगळे रे ।
समस्तांमध्ये एक ते आगळे रे ।।१५२।।


नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने ।
समाधान काहीं नव्हे तानमाने ।।
नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें ।
समाधान ते सज्जनाचेनि योगे ।।१५३।।


महावाक्य तत्त्वादिके पंचकर्णे ।
खुणे पाविजे संतसंगे विवर्णे ।।
द्वितीयेसी संकेत जो दाविजेतो ।
तया सांडूनि चंद्रमा भाविजेतो ।।१५४।।


दिसेना जनीं तेचि शोधूनि पाहे ।
बरे पाहता गुज तेथेचि आहे ।।
करी घेऊ जाता कदा आढळेना ।
जनीं सर्व कोंदाटलें ते कळेना ।।१५५।।


म्हणे जाणता तो जनीं मूर्ख पाहे ।
अतर्कासि तर्की असा कोण आहे ।।
जनीं  मीपणे पाहता पाहवेना ।
तया लक्षिता वेगळे राहवेना ।।१५६।।


बहू शस्त्र धुंडाळिता वाड आहे ।
जया निश्चयो एक तोही न  साहे ।।
मती भांडती शास्त्रबोधे विरोधें ।
गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे ।।१५७।।


श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे ।
स्मृती वेद वेदांतवाक्ये विचित्रे ।।
स्वये शेष मौनावाला स्थिर पाहे ।
मना सर्व जाणीव सांडूनि राहे ।।१५८।।


जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची ।
तया भोजनाची रुची प्राप्त कैची ।।
अहंभाव ज्या मानसीचा विरेना ।
तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना ।।१५९।।


नको रे मना वाद हा खेदकारी ।
नको रे मना भेद नानाविकारी ।।
नको रे मना शिकवूं पुढिलांसी ।
अहंभाव जो राहिला तुजपासीं ।।१६०।।



।। जय जय रघुवीर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री मनाचे श्लोक १४१ ते १५०

 

।। श्री ।।

।। श्री राम  समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।











म्हणे दास सायास त्याचे करावे ।

जनीं जाणता पाय त्याचे धरावे ।।

गुरुं अंजनेवीण तें आकळेना ।

जुने ठेवणे मीपणे ते कळेना ।।१४१।।


कळेना कळेना कळेना कळेना ।

ढळे नाढळे संशयोही ढळेना ।।

गळेना गळेना अहंता गळेना ।

बळें आकळेना मिळेना मिळेना ।।१४२।।


अविद्यागुणे मानव उमजेना ।

भ्रमे चुकले हित ते आकळेना ।।

परीक्षेविणे बांधले दृढ नाणें ।

परी सत्य मिथ्या असें कोण जाणें ।।१४३।।


जगी पाहता साच ते काय आहे ।

अती आदरे सत्य शोधुनि पाहे ।।

पुढें पाहता पाहता देव जोडे ।

भ्रम भ्रांती अज्ञान हे सर्व  मोडे ।।१४४।।


सदा विषयो चिंतिता जीव झाला ।

अहंभाव अज्ञान जन्मास आला ।।

विवेके सदा स्वस्वरुपी भरावे ।

जिवा उगमी जन्म नाही स्वभावे ।।१४५।।


दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी ।

अकस्मात आकारले काळ मोडी ।।

पुढें सर्व जाईल काही न राहे ।

मना संत आनंत शोधूनि पाहे ।।१४६।।


फुटेना तुटेना चळेना ढळेना ।

सदा संचले मीपणे ते कळेना ।।

तया  एकरूपासी दुजे ना साहे ।

मना संत आनंत शोधूनि पाहे ।।१४७।।


निराकार आकार ब्रम्हादिकांचा ।

जया सांगता शिणली वेदवाचा ।।

विवेके तदाकार होऊनि राहे ।

मना संत आनंत शोधूनि पाहे ।।१४८।।


जगी पाहता चर्मलक्षी न लक्षे ।

जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे ।।

जनीं पाहता पाहणे जात आहे ।

मना संत आनंत शोधूनि पाहे ।।१४९।।


नसे पीत  ना श्वेत ना शाम कांही ।

नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं ।।

म्हणे दास विश्वासतां मुक्ती लाहे ।

मना संत आनंत शोधूनि पाहे ।।१५०।।


।। जय जय रघुवीर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री मनाचे श्लोक १३१ ते १४०


।। श्री ।।

।। श्री राम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।













भजाया जनीं पाहता राम ऐकू ।

करी बाण एकू मुखी शब्द एकू ।। 

क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू ।

धरा जानकीनायकाचा विवेकु ।।१३१।।


विचारूनि बोले विवंनचुनी  चाले ।

तयाचेनि संतप्त तेही निवाले ।।

बरें शोधल्याविण बोलो नको हो ।

जणी चालणे शुद्ध नेमस्त राहो ।।१३२।।


हरीभक्त विरक्त विज्ञानराशी ।

जेणें मानसी स्थापिले निश्चयासी ।।

तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे ।

तया भाषणे नष्ट संदेह मोडे ।।१३३।।


नसे गर्व अंगी सदा वितरागी ।

क्षमा शांती भोगी दयादक्ष योगी ।।

नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा ।

इही लाक्षणी जाणिजे योगिराणा ।।१३४।।


 धरी रे मना संगती सज्जनाची ।

जेणें वृत्ती  पालटे दुर्जनाची ।।

बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे ।

महाक्रूर तो काळ विक्राळ  भंगे ।।१३५।।


भये व्यापिले  सर्व ब्रह्मांड आहे ।

भयातीत तें  संत आनंत पाहे ।।

जया पाहता द्वैत काहीं दिसेना ।

भयो मानसीं  सर्वथाही असेना ।।१३६।।


जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले ।

परी जिव अज्ञान तैसेचि ठेले ।।

देहेबुद्धिचें कर्म खोंटें टळेना ।

जुने ठेवणे मी पणे  आकळेना ।।१३७।।


भ्रमे नाढळे वित्त तें  गुप्त जाले ।

जीव जन्म दारिद्र ठाकूनि आले ।।

देहेबुद्धीचा निश्चयो ज्या ठाळेना ।

जुने ठेवणे मी पणे आकळेना ।।१३८।।


पुढे पाहता सर्व हि कोंदलेसे ।

अभाग्यासी हे दृश्यं पाषाण भासे ।।

अभावे कदा पुण्य गांठी पडेना ।

जुने ठेवणे मी पणे आकळेना ।।१३९।।


जायचे तया चुकले प्राप्त नाहीं ।

गुणें गोविले जाहले दुःख देहीं ।।

गुणावेगळी वृत्ती तेही वळेना ।

जुने ठेवणे मी पणे आकळेना ।।१४०।।


।। जय जय रघुवीर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...