श्री मनाचे श्लो १८१ ते १९०


।। श्री ।।

।। श्री राम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।













 नव्हे चेटकी चाळकु द्रव्यभोंदु ।

नव्हे निंदकू मत्सरू भक्तीमंदू ।।

नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू ।

जनीं ज्ञानिया तोचि साधू अगाधु ।।१८१।।


नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी ।

क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी ।।

मुखे बोलिल्यासारिखे चालताहे ।

मना सद्गुरू तोचि शोधूनि पाहे ।।१८२।।


जनीं भक्ती ज्ञानी विवेकी विरागी ।

कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी ।।

प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे ।

तयाचेनि योगे समाधान बाणे ।।१८३।।


नव्हे तेचि जाले नसे तेचि आले ।

कळों लागले सज्जनाचेनि बोलें ।।

अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे ।

मना संत आनंत शोधीत जावे ।।१८४।।


लपावे अति आदरे रामरूपी ।

भयातीत निश्चित ये स्वस्वरुपी ।।

कदा तो जनीं पाहताही दिसेना ।

सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना ।।१८५।।


सदा सर्वदा राम सन्निध आहे ।

मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ।।

अखंडित भेटी रघूराजयोगू ।

मना सांडी रे मीपणाचा वियोगु ।।१८६।।


भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे ।

परी सर्वही स्वस्वरुपी न साहे ।।

मना भासले सर्व काही पाहावे ।

परी संग सोडूनि सुखि राहावे ।।१८७।।


देहेभान हे ज्ञानशास्त्रे खुडावे ।

विदेही पणे भक्तिमार्गेचि जावे ।।

विरक्तीबळें निंद्य सर्वे त्यजावे ।

परी संग सोडूनि सुखि राहावे ।।१८८।।


मही निर्मिली देव तो ओळखावा ।

जया पाहता मोक्ष तत्काळ जिवा ।।

तया निर्गुणालागी गुणी पाहावे ।

परी संग सोडूनि सुखि राहावे ।।१८९।।


नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टीभर्ता ।

परेहुन पर्ता न लिंपे विवर्ता ।।

तया निर्विकल्पासी कल्पित जावे ।

परी संग सोडूनि सुखि राहावे ।।१९०।।


।। जय जय रघुवीर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...