जपमाळेमध्ये १०८ मनी का असतात?
नमस्कार मंडळी,
आपणांस कधी प्रश्न पडला आहे का, की जपमाळेमध्ये १०८ च मनी का असतात?
१००, ५०, २००, १००० असे का नसतात?
ह्या १०८ संखे मागे काही
शास्त्रीय कारणं आहेत. आपल्या धर्मामध्ये प्रत्येक गोष्ट
काही ना काही कारणामुळेच बनलेली आहे. जगामध्ये प्रत्येक गोष्ट घडते त्यामागे काही ना काहीतरी कारण असतेच असते.
तसेच देवाच्या नामस्मरणासाठी वापरली जाणारी जपमाळ त्यामध्ये १०८ मनी का असतात यालाही काही विशिष्ट कारणे आहेत.
त्यापैकी काहि कारणं खाली नमूद केली आहेत:
१. आपल्या सूर्यमालेत ९ ग्रह आहेत आणि
आपल्या हिंदू पंचांगानुसार १२ राशी आहेत, जर आपण ९ गुणिले १२ असं केलं तर आपल्याला १०८ ही संख्या मिळते. त्यामुळे १२ राशी व ९ ग्रह यांच्या
संख्येनुसार १०८ वेळा देवाचे
नामस्मरण करावे अशी धारणा आहे.
२. दुसरे कारण असे की, आपल्या हिंदू पंचांगानुसार २७ नक्षत्र आहेत व प्रत्येक नक्षत्राचे ४ चरण आहेत, जर आपण २७ गुणिले ४ असं केलं तर १०८ असे उत्तर मिळते म्हणून
जपमाळेमध्ये १०८ मनी असतात अशी धारणा आहे.
त्यामुळे आपण ज्या देवाचे नामस्मरण करतो, ती आपली इष्ट देवता व ९ ग्रह, १२ राशी, तसेच २७ नक्षत्र व त्यांचे ४
चरण हे आपल्या कुंडलीवर उत्तम प्रभाव टाकतात व आपली संकटे, अडथळे, व्यथा दूर होतात अशी धारणा आहे.
अशा धारणेनुसार जपमाळेतील मण्यांची संख्या १०८ अशी ठेवण्यात आलेली
आहे असा समज आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा