अधिकमास माहात्म्य पोथी भाग ३ (५१ ते ७५ ओव्या)


अधिकमास माहात्म्य पोथी (भाग ३)



धृपद राजाच्या यज्ञकुंडी प्रगट झाली पुढील जन्मी ||

आज्ञा होता कुंती ची |  पत्नी झाली पाच पांडवांची ||५१||

 

पूर्व  जन्मीच्या अपराधांचे फळ |  भोगावे लागले द्रोपतीस  ||

पांच पांडवांसवे तिच्या |  नशिबी आला वनवास ||५२||

 

ऐकुनी द्रौपदीच्या |  पूर्वजन्मीची कहानी ||

धर्मराज म्हणती |  आता तूच  तार यातुनी चक्रपाणी ||५३||

 

श्रीकृष्ण सांगती धर्मराजाला |  आता पुरुषोत्तम मास जरी येता ||

स्नान, दान, सत्कर्मे करिता |  पुण्य पदरी पडेल आता ||५४||

 

पांडवांनी व्रत आचरिता |  नशिबाचा वनवास संपला ||

युद्धात विजय होता |  गत  साम्राज्य आले हाता ||५५||

 

पुरुषोत्तमाचे व्रत घडले |  कोणास कसे फळ मिळाले ||

शास्त्रीबुवांनी ते सांगितले |  विविध कथा त्या ऐकाव्या ||५६||

 

सुदेव  नामे ब्राह्मण कोणी |  गौतमी त्याची भार्या गुणी ||

ताम्रपर्णी तटी आश्रमी |  द्रविड देशी राहातसे ||५७||

 

दोघे करिती श्रीविष्णू पूजन |  नवस  सायास केले अपार ||

परी पोटी पुत्र नसे त्यांच्या |  उदास होती मग उभयता ||५८||

 

खडतर तपश्चर्या करूनी |  विष्णूशी घेतले प्रसन्न करूनी ||

काय हवे ते माग तू वत्सा |  तुजवरी मी प्रसन्न असे ||५९||

 

पुत्र सुख द्यावे भगवंता |  त्याखेरीज मागणी नाही आता ||

वंशदीप  उजळावा माझा |  एकतरी पुत्र व्हावा मला ||६०||

 

दैवगती ही असे विचित्र |  नशिबी तुझ्या नाही पुत्र ||

दुसरे काही मागणे सांग |  मी देण्या समर्थ असे ||६१||

 

सुदेव पडला होऊनी मूर्तीत |  नाही पोटी संतान सुख ||

समजावीत गौतमी त्यास |विधिलिखित वेगळे असे ||६२||

 

विष्णूच्या आज्ञेवरूनी | गरुडाने केली कृपा ||

त्यांच्या पोटी पुत्र जन्मा आला |  त्याचे नाव शुकदेव ||६३||

 

आता होईल पुत्र  लाभ |  परी नशिबी आहे पुत्रवियोग ||

देव आणि दैव दोन्ही असे श्रेष्ठ |  ऐसे गरुड बोलीला ||६४||

 

सुदेव गौतमी हर्षयुक्त मनाने |  काळ कंठीत आनंदाने ||

वेदविद्या, शास्त्राभ्यासात  |  केले पारंगत पुत्रास ||६५||

 

बारा वर्षांचा काळ लोटला |  विहिरीवर पोहण्यास गेला ||

जलक्रीडा करतांना त्याला |  बुडून मृत्यू आला ||६६||

 

मृत पुत्राचे कलेवर |  घेऊन बैसले मांडीवर ||

शोक करिती अपार |  सुदाम, गौतमी ||६७||

 

उपास घडला महिनाभर |  त्यात पावसाची संततधार ||

तो होता अधिकमास |  नकळत घडले व्रतास ||६८||

 

प्रसन्न झाला पुरुषोत्तम |  फळ मिळाले उत्तम ||

शुक देवास करुनी जिवंत |  सुदेव गौतमी झाले आनंदित ||६९||

 

पुत्र, पौत्रादि सुखे भोगुनी |  सुदेव, गौतमी निवर्तले ||

पुढील जन्मी दोघेजण |  राज्य पदी बसले ||७०||

 

दृढ धनवा, नामे नृपती |  गौतमी नामे गुनसुंदरी ||

हैह्या देशाच्या सम्राटपदी |  झाले विराजमान दोघेजण ||७१||

 

एकदा राजा वनात गेला |  विश्रांतीसाठी क्षणभर विसावला ||

पोपोट फांदीवर बसून बोलला |  राजा सांगतो ते ऐका जरा ||७२||

 

संसारी या ऐहिक  सुखे  |  देतील तुजला अंती दुःखे ||

न मिळे अंतरी समाधान |  तरी सत्कर्मे ती करावी  जाण ||७३||

  

एवढे सांगून पोपोट गेला उडूनी | राजा उठला नवस करूनी ||                                     

अहर्निश चालले चिंतन |  पोपटाच्या उपदेशाचे ||७४||

 

एके दिनी वाल्मिकी ऋषींनी |  सांगितली कथा पूर्वजन्माची ||

नकळत घडले अधिकमास  व्रत |  तुम्हावरी कृपा करी भगवंत  ||७५||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...