अधिकमास माहात्म्य पोथी भाग १ (१ ते २५ ओव्या)

अधिकमास माहात्म्य पोथी (भाग १)

 

 

|| श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वती नमः|| ||श्री सद्गुरू नमः||  ||श्री कुलदेवता नमः||

 

 




ओम नमोजी गणनायका | एकदंता वरदायका ||

स्वरूप सुंदरा विनायका | कृपा करी मजवरी ||१||

 

आता नमो सरस्वती | हंसा रूढ शारदादेवी ||

ग्रंथ लिहिण्या द्यावी स्पूर्ती || जेणे श्रोतया सुख वाटे ||२||

 

नमन माझे गुरुवर्या | तैसे सर्व संत सजना ||

करूनी नमन पुरुषोत्तमा | नमन माझे साष्टांगी ||३||

 

अधिक महिना हा मलमास | पुरुषोत्तम नाव कैसे पडले त्यास ? ||

त्याचा महिमा असे खास | सांगे सकळ जना ||४||

 

वर्षाचे महिने असती बारा | विशिष्ट क्रमाने येती ते तेरा ||

 तीन वर्षांनी येतो अधिकमास | अपवित्र तो मलमास ||५||

 

सृष्टीच्या उत्पत्तीपासूनी | बारा महिन्यांचे असे महत्त्व ||                      

मलमास नवीन आला | नाही कोणी वाली त्याला ||६||

 

अशा त्या मलमासी | कोणी न करती शुभकार्यासी |                           

सूर्य संक्रमणही न  करी त्यातूनी | दुःखी झाला अंतकरणातूनी  ||७||

 

कोणीच त्याला न  देई थारा | मलमास म्हणुनी करिती धिक्कारा ||

माझा काय अपराध घडला | म्हणूनी हा जन्म नशिबी आला ||८||

 

एकदा त्याने करूनी विचार | धरीले श्रीविष्णूMMचे चरण ||

कथन केला सर्व वृत्तांत |पुसतसे मार्ग मुक्तीचा ||९||

 

ऐकुनी मलमासाची व्यथा | श्रीविष्णू मनोमनी गहिवरला||

तुझे दुःख दूर करण्या | समर्थ असे तो मुरलीधर  ||१०||


गोलोकी गेले दोघे जण | श्रीकृष्णासं करूनि वंदन ||

कथा सर्व केली निवेदन | मलमास पाय धरीतसे ||||

 

मलमासाची कथा ऐकूनी | गोपालकृष्ण वदले तत्क्षणी ||

स्वीकारीतो मी या क्षणी | पतित मलमासाला ||||

 

भगवंत परम  दयाळू | होऊनी मलमासावरी कृपाळू ||

ठेवी वरदहस्त त्यावरी | कृपा करी श्रीकृष्ण ||१३||

 

मलमासासी म्हणे श्रीकृष्ण | होऊ नकोस तू खिन्न ||

तुझे भाग्य थोर जाण | म्हणून आज भेटलो आपण ||१४||

 

आलास तू मजला शरण | हेच तुझ्या भाग्याचे लक्षण ||

आता यापुढे न कोणी | निंद्य मानतील तुला ||१५||

 

माझ्या ठाई जे उत्तम गुण | ते सर्व मी तुला करतो अर्पण ||

माझ्या  सारखे वैभव सगळे | त्यालाही प्राप्त होईल ||१६||

 

आता तुझ्या देही देवत्व येईल | जगतात तू प्रख्यात  होशील ||

बारा मासां हूनी श्रेष्ठ | सर्वात तुझे स्थान वरिष्ठ ||१७||

 

ऐसे सांगून मलमासा| नामाभिधान  केले पुरुषोत्तम मास ||

स्वतः संतोष पावे श्रीकृष्ण | आनंद झाला श्रीविष्णूस ||१८||

 

पुरुषोत्तम  मास  त्यास संबोधुनी | कीर्ती होईल त्रिभुवनी ||

उद्धरिल माझ्या गुणी | मीच स्वामी मलमासाचा ||१९||

 

वंदन करुनी श्रीकृष्णास | दोघे ही गेले वैकुंठास ||

तेव्हापासूनी  पुरुषोत्तम मास | श्रेष्ठ जगी ठरला असे ||२०||

 

श्रीविष्णूंच्या  साक्षीने || पुरुषोत्तम व्रत राहिले आनंदाने ||

ते आचरिता श्रीविष्णू कृपेने | सकल सिद्धी प्राप्त होतील ||२१||

 

चातुर्मासाचा काळ पवित्र | जप तप कर्त्या ब्राह्मणास ||

दान देउनी अनेक | पुण्य संचय करिती ||२२||

 

ज्याचे त्याचे पुण्याप्रमाणे | स्वर्ग सुख प्राप्त होणे ||

पुण्याचा साठा समाप्त होता | पुनर्जन्म लागतो घ्यावा ||२३||

 

पुरुषोत्तमाचे व्रत करिता | पुण्य पदरी अक्षय येता ||

जन्म मृत्यूचे भय नसता | वैकुंठी सद्गती लाभते ||२४||

 

आचरीता एक महिना पुरुषोत्तम व्रत | होतसे सुख समृद्धी प्राप्त ||

पदरी पुण्य संचय होतसे | हे या व्रताचे माहात्म्य असे ||२५||




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...