अधिक मासात पाळावयाचे नियम:
अधिक मासात प्रत्येकाने आपणास जमेल तसे किंवा आपल्या इच्छेनुसार खालील प्रमाणे नियम पाळावेत:
1. सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान किंवा मांगलिकस्नान करावे;
2. महिन्याभरात निदान एकदातरी तीर्थस्नान किंवा गंगास्नान करावे, त्यामुळे सर्व पापांचा नाश होतो असा उल्लेख आहे;
3. रोज देवदर्शन करावे व व्यसनमुक्तीचा संकल्प करावा कुठल्याही प्रकारचे व्यसन सुटू शकते;
4. देवापुढे अखंड दीप लावावा रोज त्याची मनोभावे पूजा करावी व एकाद्या ब्राह्मणास दीपदान करावे, त्यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते;
5. रोज अधिक मासाची पोथी वाचावी व ही पोती ब्राह्मणाला भेट द्यावी;
6. जेवणाच्या अगोदर गाईला गोग्रास द्यावा व यथाशक्ती अन्नदान करावे;
7. शक्यतो दररोज एक वेळ भोजन करावे, जेवताना मौनव्रत अवश्य पाळावे त्यामुळे मानसिक समाधान मिळवून आत्मबळ वाडीस उपयोग होतो;
8. महिन्यातून कमीत कमी एक दिवस तरी संपूर्ण उपवास करावा;
9. जावयांना आपल्या इच्छेनुसार 33 अनारसे अथवा इतर पदार्थ म्हणजेच बत्तासे, खारका, सुपाऱ्या, फळे, लाडू, करंज्या इत्यादी पदार्थ वाण म्हणून द्यावेत.
अधिक मासामध्ये शुभकार्य जरी वर्ज्य असतील तरी वरील दिलेले नियम पाळून आपण
पुण्याचे भागीदारी होऊ शकतो. अधिक मास तीन वर्षातून एकदा येत असल्यामुळे
जास्तीत जास्त लोकांनी वरील नियम पाळून अधिकाधिक पुण्य आपल्या पदरी पाडून घ्यावे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा