अधिकमास माहात्म्य पोथी भाग २ (२६ ते ५० ओव्या)


अधिकमास माहात्म्य पोथी (भाग २)




या पुण्यकालात | स्नान करुनी पवित्र तीर्थात ||

यथाशक्ती करावे दान | एक भुक्त: राहून||२६||


जप, तप, संध्या, स्नान | करावे उपोषण दीपदान ||

ऐसे आचरिता व्रताचरण | पुरुषोत्तम मासी ||७||

 

चालू करता व्रतारंभस | कर्म करावे अर्पण श्रीकृष्णास  ||

थारा न द्यावा विकल्पास | शुद्ध भाव मनी असावा ||८||

 

करिता सांगता, पुरुषोत्तम व्रताची | सकाळ फळे मिळतील त्याची ||

विघ्ने होतील सर्व  दूर | मनोकामना होतील पूर्ण ||२९||

 

काम्यक  वनात पांडवांना | विघ्ने येत होती नाना ||

श्रीकृष्णाचा केला मनी धावा | धावत आला तो जगजेठी ||३०||

 

पांडव म्हणती श्रीकृष्णसी | तू असता आमच्या पाठीसी||

तरी हा वनवास नशिबी | काय म्हणूनी आला ? ||३१||

 

श्रीकृष्ण वदला पांडवांसी | आचारीले नाही पुरुषोत्तम  व्रताचसी||

नाही केली तीर्थस्नाने, दाने, सत्कर्मे |  पुण्य कालात ||३२||

  

द्रोपदी ने केला अवमान |  पुरुषोत्तम मासाचा ||

त्या  कारणेच तिला पाच पती लाभून | गेले सम्राज्ञी पद सोडून ||३३|

 

तरी आता करावे |  अधिकमास व्रत ||

पार पाडावीत पुण्यकृत्य सर्व |  शेवटी नाश होईल दुःखाचा ||३४||

 

येता तेरावा अधिकमास |  आचारीता  त्या महाव्रतास ||

गत साम्राज्य, कीर्ति,  मान |  सर्व परत मिळेल ||३५||

 

पांडव श्रीकृष्णासी म्हणाले | आमच्या हातून कोणते पाप घडले ||

कोणते अपराध घडले पूर्वजन्मी | कृपा करुन आम्हासी सांगावे ||३६||

 

 पूर्वजन्मी द्रौपदी ही मेधावी ऋषींची कन्या असे ||

सर्व  गुण  संपन्न असून |  मेधावती नाव तिचे ||३७||

 

बाळपणीच होता आई स्वर्गवासी | पित्याने माया आईची दिली ||

अनेक शास्त्रे  शिकवूनी |  पित्यानेच वाढविले तीसी ||३८||

 

मेधावतीस  योग्य पती मिळण्या | वणवण केली पित्याने ||

एकाएकी ज्वर  भरला |  झडप घातली मृत्यूने ||३९||

 

नाही आई, नाही पिता |  आधारच गेला सर्वस्वी तिचा ||

काय करावे काही सुचेना |  अन्नपाणी गोड लागेना ||४०||

 

तपस्विनी ती अति हुशार |  मिळे  न तीजला त्याला योग्य वर ||

बसून राहिली गुंग होऊन |  शिव आराधना करीतसे ||४१||

 

एकदा ऋषीमुनी दुर्वास |  येऊनी उभे राहिले दारात ||

सांगुनी मेधावतीस |  दुःखी  कष्टी तू होऊ नकोस ||४२||

 

यावर्षी येईल अधिकमास |  तो आहे पुरुषोत्तम मास ||

मनोभावे आचार त्या व्रतास |  त्याचे फळ मिळेल तुजला खास ||४३||

 

मेधावती म्हणाली मुनिवर्य |  अधिकमास म्हणजे मलमास ||

नाही मंगल कार्यास तो योग्य |  तरी त्याचे महत्त्व नसे ||४४||

 

सर्व देवांत असे महान |  उमा  महेश्वर शंकर भगवान ||

त्यांचेच मी करिते पूजन |  मला नको ते पुरुषोत्तम  व्रत ||४५||

 

मेधावती चे ऐकुनी बोलणे |  दुर्वास ऋषी कोपले रागाने ||

पुरुषोत्तमासी  तु  धिक्कारलेस | फळे भोगशील याची ||४६||

 

पुढील जन्मी तू सम्राज्ञी होशील |  परी वनवासातील दुःखे  भोगशील ||

दुर्वास ऋषींनी दिला  शाप |  नाही तो खोटा ठरणार ||४७||

 

उग्र तपश्चर्या करून |  तिने केली शंकराची आराधना ||

दिव्य मूर्ती पाहून त्यांची |  मेधावतीने केला नमस्कार त्यांना ||४८||

 

देवा मला पती  दे, पती  दे |  पांच वेळा म्हणुनी असे ||

मागणे मागितले शंकराकडे |  तथास्तु म्हणून ते अंतर्धान पावले  ||४९||

 

मेधावतीस सुचेना काही |  यातूनही आपण वाचत नाही ||

खात्री होती शापवाणीची |  मृत्यू पावली भिऊनि तीही  ||५०||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...