||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वती नमः|| ||श्री सद्गुरू नमः||
अधिकमास महात्म्य / अधिक मास म्हणजे काय?
या महिन्यात कोणकोणती व्रत-वैकल्ये केली जातात?
व त्याचे फळ काय मिळते? या विषयी थोडी माहिती.
साधारणतः दर तीन वर्षांनी अधिक मास येतो. मराठी महिन्याप्रमाणे चैत्रa पासून फाल्गुन पर्यंत बारा महिन्यात 355 दिवस येतात, परंतु इंग्रजी महिन्याप्रमाणे म्हणजेच सौर वर्षाचे 365 दिवस येतात, हा 10 दिवसांचा फरक तीन वर्षांनी 30 दिवस झाल्यावर एक महिना अधिक घालून हे पुन्हा पूर्ववत करतात.
आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे येणारे सण, उत्सव, व्रतवैकल्ये ही सर्व चंद्रमावर / चंद्र गतीवर आधारलेली आहेत. पण ऋतूमास सौर वर्षांवर म्हणजेच सूर्याच्या गतीवर अवलंबून असतात.
आपले सण ठराविक काळात व ठराविक महिन्यात यावेत म्हणून पंचांगकर्त्यांनी दर तीन वर्षांनी चंद्र मासाचा एक महिना ज्यादा धरून दोन्ही प्रकारच्या कालगणनेत maoळ बसविला आहे.
सूर्य प्रत्येक महिन्यात एक रास बदलतो अशा वर्षातील बारा राशींमध्ये सूर्य संक्रमण करतो. प्रत्येक राशीत सूर्य जातो त्याला संक्रांत असे म्हणतात. यात बदल होत होत 33 महिन्यांनी असा महिना येतो की त्या महिन्यात संक्रांत नसते.
या बिन संक्रांतीच्या महिन्याला अधिक मास असे म्हणतात. अधिक महिन्याला पुढच्या महिन्याचे नाव घेतात म्हणजे अश्विन महिना अधिक असेल तर भाद्रपद महिन्यानंतर अधिक अश्विन महिना येतो व त्यानंतर निज अश्विन म्हणजेच नेहमीचा मूळचा महिना सुरू होतो.
अधिक महिन्यात विवाह, उपनयन, वास्तुशांत, गृहप्रवेश इत्यादी शुभ कार्य करीत नाहीत, त्यामुळे याला मलमास असेही म्हणतात.
परंतु
अधिक महिना हा मोठ्या पvaa- प्रमाणे असतो. या महिन्यात व्रते-वैकल्ये, उपासना, दानधर्म इत्यादी धार्मिक कृत्य करतात. त्यामुळे पुण्य पदरी पडून मनःशांती
लाभते,
सुख-समृद्धी व समाधान प्राप्त होते.
||हरी ॐ||
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा