||श्री शंकराची आरती||
लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा | विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा |
लावण्य सुंदर मस्तकी बाळा | तेथूनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ||१||
जयदेव जयदेव जय श्रीशंकरा | आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा || जय देव जय देव ||ध्रु||
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा | अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा |
विभूतीचे उधळण शितिकंठ निळा | ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ||२||
जयदेव जयदेव जय श्रीशंकरा | आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा || जय देव जय देव ||ध्रु||
देवीदैत्यी सागर मंथन पै केले | त्यामाजी अवचित हळहळ जे उठिले |
ते त्वा असुरपणे प्राशन केले | निळकंठ नाम प्रसिद्ध झाले ||३||
जयदेव जयदेव जय श्रीशंकरा | आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा || जय देव जय देव ||ध्रु||
व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी | पंचानन मनमोहन मुखीजन सुखकारी |
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी | रघुकुळटिळक नाम दासा अंतरी ||४||
जयदेव जयदेव जय श्रीशंकरा | आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा || जय देव जय देव ||ध्रु||
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा