श्री मनाचे श्लोक ९१ ते १००


।। श्री ।।

।। श्रीराम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।



 








।। श्री मनाचे श्लोक ९१ ते १०० ।। 




नको वीट मानू रघुनायकाचा ।

अती आदरे बोलिजे राम वाचा ।

न वेचे मुखी सापडे रे फुकाचा ।

करी घोष त्या जानकीवल्लभाचा ।। ९१ ।।

 

 

अती आदरे सर्वही नामघोषे ।

गिरिकंदरे जाईजे दूरी दोषे ।।

हरी तिष्ठतू तोषला नामतोषे ।

विशेषे हरा मानसी रामपीसे ।। ९२ ।।

 

 

 

जगी पाहता देव हा अन्नदाता ।

तया लागली तत्त्वता सार चिंता ।।

तयाचे मुखी नाम घेता फुकाचे ।

मना सांग पां रे तुझे काय वेचे ।। ९३ ।।

 

 

तिन्ही लोक जाळू शके कोप येता ।

निवाला हरू तो मुखे नाम घेता ।।

जपे आदरे पार्वती विश्वमाता ।

म्हणोनि म्हणा तेचि हे नाम आता ।। ९४ ।।

 

 

अजामेळ पापी वदे पुत्रकामे ।

तया मुक्ति नारायणाचेनि नामे ।।

शुकाकारणे कुंटणी राम वाणी ।

मुखे बोलता ख्याति जाली पुराणी ।। ९५ ।।

 

 

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी ।

जपे रामनामावळी नित्यकाळी ।।

पिता पापरूपी तया देखवेना ।

जनी दैत्य तो नाम मूखे म्हणेना ।। ९६ ।।

 

 

मुखी नाम नाही तया मुक्ति कैची ।

अहंतागुणे यातना ते फुकाची ।।

पुढे अंत येईल तो दैन्यवाणा ।

म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ।। ९७ ।।

 

 

हरीनाम नेमस्त पाषाण तारी ।

बहू तारिले मानवदेहधारी ।।

तया रामनामी सदा जो विकल्पी ।

वदेना कदा जीव तो पापरूपी ।। ९८ ।।

 

 

 

जगी धन्य वाराणसी पुण्यरासी ।

तयेमाजि जाता गती पूर्वजांसी ।।

मुखे रामनामावळी नित्यकाळी ।

जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ।। ९९ ।।

 

 

यथासांग रे कर्म तेही घडेना ।

घडे कर्म ते पुण्य गांठी पडेना ।।

दया पाहता सर्वभूती असेना ।

फुकाचे मुखी नाम तेही वसेना ।। १०० ।।



।। जय जय रघुविर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...