।। श्री ।।
।। श्रीराम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
।। श्री मनाचे श्लोक ७१ ते ८० ।।
जयाचेनि नामे महा दोष जाती ।
जयाचेनि नामे गती पाविजेती ।।
जयाचेनि नामे घडे पुण्यठेवा ।
प्रभाते
मनी राम चिंतीत जावा ।। ७१ ।।
न वेचे कदा ग्रंथिचे अर्थ काही ।
मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ।।
महा घोर संसार शत्रु जिणावा ।
प्रभाते
मनी राम चिंतीत जावा ।। ७२ ।।
देहेदंडणेचे
महादुःख आहे ।
महादुःख ते नाम घेता न राहे ।।
सदाशीव
चींतीतसे देवदेवा ।
प्रभाते
मनी राम चिंतीत जावा ।। ७३ ।।
बहुंतापरी
संकटे साधनांची ।
व्रते दान उद्यापने ती धनाची ।।
दिनाचा
दयाळू मनी आठवावा ।
प्रभाते
मनी राम चिंतीत जावा ।। ७४ ।।
समस्तामध्ये
सार साचार आहे ।
कळेना तरी सर्व शोधूनि पाहे ।।
जीवा
संशयो वाउगा तो त्यजवा ।
प्रभाते
मनी राम चिंतीत जावा ।। ७५ ।।
नव्हे
कर्म ना धर्म ना योग काहीं ।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ।।
म्हणे
दास विश्वास नामी धरावा ।
प्रभाते
मनी राम चिंतीत जावा ।। ७६ ।।
करी
काम निष्काम या राघवाचे ।
करी रूप स्वरूप सर्वा जिवांचे ।।
करी
छंद निर्व्दंद हे गूण गातां ।
हरीकीर्तनी
वृत्तिविश्वास होता ।। ७७ ।।
अहो
ज्या नरा रामविश्वास नाही ।
तया पामरा बाधिजे सर्व काही ।।
महाराज
तो स्वामी कैवल्यदाता ।
वृथा
वाहणे देहसंसारचिंता ।। ७८ ।।
मना
पावना भावना राघवाची ।
धरी
अंतरी सोडी चिंता भवाची ।।
भवाची
जिवा मानवा भुली ठेवा ।
नसे
वस्तुची धारणा व्यर्थ गेली ।। ७९ ।।
धरा
श्रीवरा त्या हरा अंतराते l
तरा दुस्तरा त्या परा सागराते ।।
सरा
विसरा त्या भरा दुर्भराते ।
करा
नीकरा त्या खरा मत्सराते ll ८० ।।
।। जय जय रघुविर समर्थ ।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा