श्री मनाचे श्लोक ८१ ते ९०


।। श्री ।।

।। श्रीराम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।


 








।। श्री मनाचे श्लोक ८१ ते ९० ।। 



मना मत्सरे नाम सांडू नको हो ।

अती आदरे हा निजध्यास राहो ।।

समस्तामधे नाम हे सार आहे

दुजी तूळणा तूळिताही न साहे ।। ८१ ।।

 

 

बहू नाम या रामनामी तुळेना

अभाग्या नरा पामरा हे कळेना ।।

विषा औषध घेतले पार्वतीशे ।

जिवा मानवा किंकरा कोण पूसे ।। ८२ ।।

 

 

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो ।

उमेसी अती आदरें गूण गातो ।।

बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे ।

परी अंतरी नामविश्वास तेथे ।। ८३ ।।

 

 

विठोने शिरी वाहिला देवराणा ।

तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ।।

निवाला स्वये तापसी चंद्रमौळी ।

जिवा सोडवी राम हा अंतकाळी ।। ८४ ।।

 

 

भजा राम विश्राम योगेश्वरांचा ।

जपू नेमिला नेम गौरीहराचा ।।

स्वयें निववी तापसी चंद्रमौळी ।

तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी ।। ८५ ।।

 

 

मूखी राम विश्राम तेथेचि आहे ।

सदानंद आनंद सेवूनि राहे ।।

तयावीण तो सीण संदेहकारी ।

निजधाम हे नाम शोकापहारी ।। ८६ ।।

 

 

मुखी राम त्या काम बाधू शकेना ।

गुणे इष्ट धारिष्ट्य त्याचे चुकेना ।।

हरिभक्त तो शक्त कामास मारी ।

जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ।। ८७ ।।

 

 

बहू चांगले नाम या राघवाचे ।

अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ।।

करी मूळ निर्मुळ घेता भवाचे ।

जिवा मानवा हेचि कैवल्य साचे ।। ८८ ।।

 

 

जनी भोजनी नाम वाचे वदावे ।

अती आदरे गद्य घोषे म्हणावे ।।

हरीचिंतने अन्न सेवीत जावे ।

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।। ८९ ।।

 

 

न ये राम वाणी तया थोर हानी ।

जनी व्यर्थ प्राणी तया नाम कानी ।।

हरिनाम हे वेदशास्त्री पुराणी ।

बहू आगळे बोलिली व्यासवाणी ।। ९० ।।


।। जय जय रघुविर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...