श्री मनाचे श्लोक १०१ ते ११०


।। श्री ।।

।। श्रीराम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।












।। श्री मनाचे श्लोक १०१ ते ११० ।। 



जया नावडे नाम त्या येम जाची ।

विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ।।

म्हणोनी अती आदरे नाम घ्यावे ।

मुखे बोलता दोष जाती स्वभावे ।। १०१ ।।

 

अती लीनता सर्वभावे स्वभावे ।

जना सजनालागी संतोषवावे ।।

देहे कारणी सर्व लावीत जावे ।

सगुणी अती आदरेसी भजावे ।। १०२ ।।

 

हरी कीर्तने प्रीती रामी धरावी ।

देहेबुद्धी नीरूपणी विसरावी ।।

परद्रव्य आणीक कांता परावी ।

यदर्थी मना सांडी जीवी करावी ।। १०३ ।।

 

क्रीयेवीण नानापरी बोलिजेते ।

परा चित्त दुश्चित्त ते लाजवीते ।।

मना कल्पना धीट सैराट धावे ।

तया मानवा देव कैसेनि पावे ? ।। १०४ ।।

 

विवेके क्रिया आपुली पालटावी ।

अती आदरे शुद्ध क्रिया धरावी ।।

जनी बोलण्यासारखे चाल बापा ।

मना कल्पना सोडि संसारतापा ।। १०५ ।।

 

बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा ।

विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा ।।

दया सर्व भुतीजया मानवाला ।

सदा प्रेमळू भक्तीभावे निवाला ।। १०६ ।।

 

मना कोप-आरोपणा ते नसावी ।

मना बुद्धी हे साधुसंगी वसावी ।।

मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी ।

मना होइ रे मोक्षभागी विभागी ।।१०७ ।।

 

सदा सर्वदा सज्जनाचेनि योगे ।

क्रिया पालटे भक्तीभावार्थ लागे ।।

क्रियेवीण वाचाळता ते निवारी ।

तुटे वाद संवाद तो हीतकारी ।। १०८ ।।

 

जनी वादवेवाद सोडूनी द्यावा ।

जनी सुखसंवाद सुखे करावा ।।

जगी तोची तो शोकसंतापहारी ।

तुटे वादसंवाद तोहीतकारी ।। १०९ ।।

 

तुटे वादसंवाद त्याते म्हणावे ।

विवेके अहंभाव याते जिणावे ।।

अहंतागुणे वाद नानाविकारी ।

तुटे वाद संवाद तो हीतकारी ।। ११० ।।



।। जय जय रघुविर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...