।। श्री ।।
।। श्रीराम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

।। श्री मनाचे श्लोक १११ ते १२० ।।
हिताकारणे सर्व शोधूनी पाहे ||
हिताकारणे बंड पाखाड वारी |
तुटे वाद संवाद तो हितकारी || १११ ||
जनी सांगता ऐकता जन्म गेला |
परी वाद वेवाद तैसाचि ठेला ||
उठे संशयो वाद हा दंभधारी |
तुटे वाद संवाद तो हितकारी || ११२ ||
जनी हित पंडित सांडीत गेले
अहंतागुणे ब्रम्ह राक्षस झाले
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे
मना सर्व जाणिव सांडुनी राहे || ११३ ||
फुकाचे मुखी बोलता काय वेचे |
दिसेंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ||
क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे |
विचारे तुझा तुची शोधूनी पाहे ||११४ ||
तुटे वाद संवाद तेथे करावा |
विवेके अहंभाव हा पालटावा ||
जनीं बोलण्यासारिखे आचरावे |
क्रियापालटे भक्तीपंथेची जावे || ११५ ||
बहु शापिता कष्ठला अंबरुषी |
तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी ||
दिला क्षीरसिंधु तया उपमानी|
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||११६ ||
धरु लेकरू बापुडे दैन्यवाने |
कृपा भाकीता दिधली भेट जेणे ||
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || ११७ ||
गजेंद्रु महासंकटी वाटपाहे |
तयाकारणे श्रीहरी धावताहे ||
उडी घातली जाहला जिवदानी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || ११८ ||
अजामेळ पापी तया अंत आला |
कृपाळुपणे तो जनी मुक्त केला ||
अनाथासी आधार हा चक्रपाणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || ११९ ||
विधीकारणे जाहला मत्सवेगी |
धरी कूर्मरुपे धरा पृष्ठभागी ||
जना रक्षणाकारणे हीन योनी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || १२० ||
।। जय जय रघुविर समर्थ ।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा