।। श्री ।।
।। श्रीराम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
।। श्री मनाचे श्लोक १२१ ते १३० ।।
महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला |
म्हणोनी तया कारणे सिंह झाला ||
न ये ज्वाल विशाल संनिध कोणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || १२१ ||
कृपा भाकिता जाहला वज्रपाणी |
तया कारणे वामनु चक्रपाणी ||
द्विंजाकारणे भार्गवु चाचपाणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || १२२ ||
अहिल्येसती लागी आरण्यपंथे |
कुढावा पुढे देव बंदी तयाते ||
बले सोडीता घाव घाली निशाणी |
नुपेक्षी कदा देव दासाभिमानी || १२३ ||
तये द्रौपदीकारणे लागवेगे |
त्वरे धावतो सर्व सांडोनी मागे ||
कलीलागी झाला असे बैद्धमैनी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || १२४ ||
अनाथा दिनाकारणे जन्मताहे |
कलंकी पुढे देव होणार आहे ||
तया वर्णिता शिणली वेदवाणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || १२५ ||
जणाकारणे देव लिलावतारी |
बहुतांपरी आदरें वेषधारी ||
तया नेणती ते जन पापरुपी |
दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी || १२६ ||
जगी धन्य तो राम सुखे निवाला |
कथा ऐकता सर्व तल्लीन झाला ||
देहे भावना राम बोधे बुडाली |
मनोवासना रामरुपी बुडाली || १२७ ||
मना वासना वासुदेवी वसो दे |
मना कामना काम संगी नसो दे ||
मना कल्पना वाऊगी ते न कीजे |
मना सज्जना सज्जनी वस्ती किजे || १२८ ||
गती कारणे संगती सज्जनांची |
मती पालटे सुमती दुर्जनांची ||
रती नायिकेचा पति नष्ट आहे |
म्हणोणी मनातीत होवोनी राहे || १२९ ||
मना अल्प संकल्प तोही नसावा |
सदा सत्यसंकल्प चित्तिवसावा ||
जनी जल्प विकल्प तोही त्यजावा |
रमाकांत एकांत काली भजावा || १३० ||
।। जय जय रघुविर समर्थ ।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा