श्री मनाचे श्लोक १४१ ते १५०

 

।। श्री ।।

।। श्री राम  समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।











म्हणे दास सायास त्याचे करावे ।

जनीं जाणता पाय त्याचे धरावे ।।

गुरुं अंजनेवीण तें आकळेना ।

जुने ठेवणे मीपणे ते कळेना ।।१४१।।


कळेना कळेना कळेना कळेना ।

ढळे नाढळे संशयोही ढळेना ।।

गळेना गळेना अहंता गळेना ।

बळें आकळेना मिळेना मिळेना ।।१४२।।


अविद्यागुणे मानव उमजेना ।

भ्रमे चुकले हित ते आकळेना ।।

परीक्षेविणे बांधले दृढ नाणें ।

परी सत्य मिथ्या असें कोण जाणें ।।१४३।।


जगी पाहता साच ते काय आहे ।

अती आदरे सत्य शोधुनि पाहे ।।

पुढें पाहता पाहता देव जोडे ।

भ्रम भ्रांती अज्ञान हे सर्व  मोडे ।।१४४।।


सदा विषयो चिंतिता जीव झाला ।

अहंभाव अज्ञान जन्मास आला ।।

विवेके सदा स्वस्वरुपी भरावे ।

जिवा उगमी जन्म नाही स्वभावे ।।१४५।।


दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी ।

अकस्मात आकारले काळ मोडी ।।

पुढें सर्व जाईल काही न राहे ।

मना संत आनंत शोधूनि पाहे ।।१४६।।


फुटेना तुटेना चळेना ढळेना ।

सदा संचले मीपणे ते कळेना ।।

तया  एकरूपासी दुजे ना साहे ।

मना संत आनंत शोधूनि पाहे ।।१४७।।


निराकार आकार ब्रम्हादिकांचा ।

जया सांगता शिणली वेदवाचा ।।

विवेके तदाकार होऊनि राहे ।

मना संत आनंत शोधूनि पाहे ।।१४८।।


जगी पाहता चर्मलक्षी न लक्षे ।

जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे ।।

जनीं पाहता पाहणे जात आहे ।

मना संत आनंत शोधूनि पाहे ।।१४९।।


नसे पीत  ना श्वेत ना शाम कांही ।

नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं ।।

म्हणे दास विश्वासतां मुक्ती लाहे ।

मना संत आनंत शोधूनि पाहे ।।१५०।।


।। जय जय रघुवीर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...